माढा (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातिल माढा तालुक्यातील उजनी गावचे हाडाचे शेतकरी कै. विलास प्रल्हाद जाधव यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेला म्हणजे आधार गेला असे होते, परंतु त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले व पुतण्या यांनी सामाजिक बांधिलकी जपून सावडल्यानंतर अस्थी नदीमध्ये विसर्जित न करता आपल्याच शेतामध्ये खड्डे घेऊन त्यामध्ये भरून त्यावर आंब्याची रोप लाऊन एक नवीन आदर्श सर्वासमोर निर्माण केला आहे.
भविष्यात याच झाडाच्या सावलीमध्ये बसल्यास आपल्या वडिलांच्या सावलीत बसल्याचा अनुभव नक्कीच येइल, अशी भावना मुलांनी बोलुन दाखवली. त्यांच्या या आदर्शवादी उपक्रमाला घरातील वडीलधारी मंडळी, भावभावकी तसेच गावकरी मंडळी यांनी साथ देऊन गावामध्ये एक नवीन प्रथा सुरु केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी पुतणे उध्दव जाधव यांनी सांगितले की, मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचारांवर आम्ही वाटचाल करत असताना निसर्ग जोपासत आम्ही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला असून इतरांनी ही अस्थी नदी अथवा तलावामध्ये विसर्जित न करता आपल्याच शेतात करावे, असे आवाहन केले. या उपक्रमाबद्दल परिसरात जोरदार चर्चा आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng