बारामती (बारामती झटका)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नातू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाउंडेशनच्यावतीने ओपन व तालुका वाईज डे-नाईट भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार्थ दादा चषक २०२२ आयोजन करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. ९ मार्च ते १३ मार्च २०२२ पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडियम, बारामती येथे असणार आहे. ही स्पर्धा लिग पद्धतीने घेण्यात येणार आहे.
पार्थ दादा चषक २०२२ स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रथम पारितोषिक २,०००००/-, द्वितीय बक्षीस १,०००००/-, तृतीय बक्षीस ५१,०००/-, चतुर्थ बक्षीस २५,०००/-, मॅन ऑफ द सिरीज आय फोन ११, बेस्ट बॅट्समन १०,०००/-, बेस्ट बॉलर १०,०००/-, बेस्ट बॉलर ऑफ द डे शुज व सन्मानचिन्ह, बेस्ट बॅट्समन ऑफ द डे बेट व सन्मानचिन्ह असे असणार आहे.

यामध्ये प्रथम चषक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष अजिंक्यभाऊ ढमाळ, द्वितीय चषक सामाजिक कार्यकर्ते सारसभाऊ भोसले, तृतीय चषक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस पार्थ प्रवीण गालिंदे तर चतुर्थ चषक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बारामती तालुका अध्यक्षा भाग्यश्रीताई धायगुडे यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये क्रिकेटप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन पार्थ दादा पवार फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng