पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची पानीव येथे सदिच्छा भेट

पानीव (बारामती झटका)

राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पानीव ता. माळशिरस येथील दिवंगत माजी आमदार शामराव पाटील कुटुंबियांच्या निवासस्थानी शुभेच्छा भेट दिली. याप्रसंगी पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, डॉ. सुनील पाटील, पानीवच्या सरपंच श्रीलेखा पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.

श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमानिमित्त माळशिरस तालुक्यात आलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉ. सुनील पाटील यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधामुळे पानीव येथे आवर्जून उपस्थित राहिले. या अगोदरही विखे पाटील हे पाटील कुटुंबीयांच्या विविध समारंभात तसेच दुःखद घटनांच्या प्रसंगी आवर्जून पानीव येथे येवून पाटील कुटुंबीयांना धीर देवून पाठीशी उभे राहिले.

यावेळी अकलूजच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार जगदीश निंबाळकर, पोलीस तसेच महसूलचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमांडवे-कण्हेर-मांडकी-जळभावी रस्ता जिल्हा मार्ग करावा – युवानेते रितेशभैया पालवे पाटील.
Next articleAvast Antivirus Assessment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here