पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा माणिकबापू वाघमोडे परिवार यांच्यावतीने फत्तेसिंह माने पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान.
शंकरनाना देशमुख, पांडुरंगभाऊ देशमुख, तुकाभाऊ देशमुख, बाळासो कर्णवर पाटील, डॉ. मारुतीराव पाटील, गौतमआबा माने, निजामभाई काजी, राजाभाऊ हिवरकर, विकासदादा धाईंजे, केपी उर्फ शंकरराव काळे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
माळशिरस ( बारामती झटका )
महाविकासआघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांच्या माळशिरस शहरातील राजमाता निवासस्थानी आवर्जून सदिच्छा भेट देऊन चहापानाचा आस्वाद घेत विविध राजकीय, सामाजिक विषयावर मन मोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या.

पालकमंत्री दत्तामामा भरणे माळशिरस शहरातील स्टार आयसीयू हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळेस त्यांनी माणिकबापू वाघमोडे यांच्या राजमाता निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाभाऊ देशमुख, श्री श्री सदगुरू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतमआबा माने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निजामभाई काझी, समता परिषदेचे राजाभाऊ हिवरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष अक्षयभैय्या भांड, माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, युवा नेते केपी उर्फ शंकरराव काळे पाटील, युवा उद्योजक गोरख देशमुख आदी मान्यवरांसह माणिकबापू वाघमोडे परिवारातील हनुमंतदादा वाघमोडे, ॲड. आप्पासो वाघमोडे, दत्तादादा वाघमोडे, देविदास वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, ओम आप्पासो वाघमोडे, आप्पासो हनुमंत वाघमोडे, सागर हनुमंत वाघमोडे, रावसाहेब दत्तू वाघमोडे, मनोज वाघमोडे, पोपट वाघमोडे, काकासो पाटील, सचिन वाघमोडे, अक्षय वाघमोडे, किशोर वगरे, आप्पासो वाघमोडे आदी वाघमोडे परिवारासह पत्रकार संजय हुलगे, स्वप्निल कुमार राऊत, श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी माणिकबापू वाघमोडे यांच्या राजमाता निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याबद्दल वाघमोडे परिवार यांच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
दत्तामामा भरणे आणि उपस्थित नेत्यांमध्ये विविध राजकीय व सामाजिक विषयांवर मन मोकळेपणाने चर्चा करण्यात आली. पत्रकारांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीविषयी पालकमंत्री यांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाविषयी विचारले असता सावध भूमिका घेत सकारात्मक उत्तर पालकमंत्री यांनी दिलेले असल्याने भविष्यात राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होईल, असा विश्वास पालकमंत्री यांच्या बोलण्यावरून प्रचीती आलेली आहे.
पालकमंत्री दत्तामामा भरणे व उपस्थित मान्यवर यांनी चहा बिस्किटाचा आस्वाद घेतला. राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांच्या निवासस्थानी चाय पे चर्चा रंगलेली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng