पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदास देशमुख यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

महा विकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचे माळशिरस पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ शुभांगी देशमुख यांनी औक्षण करून स्वागत केले.

माळशिरस ( बारामती झटका )

महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तामामा भरणे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख यांच्या माळशिरस येथील संजीवनी हॉस्पिटल निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.


सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तामामा भरणे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते त्यावेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावान सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख यांच्या निवासस्थानी आवर्जून सदिच्छा भेट देऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

पालक मंत्री यांचे संजीवनी हॉस्पिटल निवासस्थानी आगमन होताच माळशिरस पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ शुभांगी देशमुख यांनी औक्षण करून स्वागत केले यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, सदाशिवराव माने विद्यालयाचे माजी सभापती हिंदुराव माने पाटील, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निजामभाई काझी, समता परिषदेचे राजाभाऊ हिवरकर, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती हंसराज माने पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अक्षयभैया भांड,आदी मान्यवरांसह डॉक्टर रामदास देशमुख परिवारातील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यशराज देशमुख, कीर्तीराजसिंह देशमुख, सुहास देशमुख, निलेश देशमुख, कालिदास देशमुख, श्यामराव देशमुख, आदी देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.


देशमुख परिवाराच्या वतीने पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा सन्मान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख यांनी केला स्नेह भोजनानंतर विविध राजकीय सामाजिक विषयावर मनसोक्त व मन मोकळे पणाने चर्चा करण्यात आली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleछत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आमरण उपोषणास धैर्यशील मोहिते-पाटील सपत्नीक भेटून माळशिरस सकल मराठा समाजाचा पाठिंबा दर्शविला.
Next articleश्रीमंत खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणास माळशिरस तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here