पालकमंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांना जिल्ह्यात फिरकु देणार नाही-सचिन जगताप

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील वीज कनेक्शन कपात वारंवार केल्यामुळे मगरवाडी ता. पंढरपूर येथील सुरज जाधव या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. सततची नापिकी, वारंवार निवेदने, आंदोलने करुनही सरकारने चार महिन्यांत ३ वेळा वीज कनेक्शन कट केले. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने निष्क्रिय पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरकु देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी दिला आहे. रविवारी सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा नियोजित दौरा संभाजी ब्रिगेड उधळून लावणार आहे.

यावेळी पुढे बोलताना जगताप म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या परवा केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी बांधवात नैराश्य निर्माण झाले असून त्यातुनच आज सुरज जाधव यांनी आत्महत्या केली आहे. आम्ही गेली चार महिने वीज महावितरण कंपनीकडून वारंवार खंडित केल्या जात असलेल्या प्रश्नावर वारंवार आंदोलने केली. परंतु, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे मामा यांनी एकदाही सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न ना विधानभवनात लावून धरला ना जिल्ह्यातील वीज महावितरण अधिका-यास फैलावर घेतले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भरणे मामा यांनी वीज पुरवठा सुरळीत करुनच जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते कार्यक्रम उधळून लावणार.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअखेर कोरोनाकाळ संपल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आनंदी आणि उत्साही वातावरणात सुरू.
Next articleप्रा. सुहास तरंगे यांनी NS-NIS पदवी मिळवल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here