पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत मोहिते पाटील यांनी केले मात्र, शासकीय गाडीत बसवले नाही.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रशांतमालक परिचारक तिघेच हेलिपॅड वरून कार्यक्रम स्थळाकडे रवाना

श्रीपुर ( बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथे आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार प्रशांतमालक परिचारक, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक महामंत्री धैर्यशील मोहितेपाटील यांच्यासह महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, कृषी प्रशासन, पशुसंवर्धन प्रशासन कारखाना प्रशासन, महाळूंग
श्रीपुर नगरपंचायत यांच्यासह अनेकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रशांतमालक परिचारक शासकीय गाडीतून हेलीपॅडवरून कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाले. आ. रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांना शासकीय गाडीत बसवले नसल्याची चर्चा तालुक्यात पसरली आहे. भाजपच्या खुर्द गटात अस्वस्थता, बुद्रुक गटात आनंद तर विरोधी गटात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे आसवानी प्रकल्प विस्तारीकरण उद्घाटन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. सदर कार्यक्रम पत्रिकेवर आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव नव्हते, कसेतरी स्टेजवरील बॅनरवर झळकत होते. मात्र, शासकीय गाडीत बसवले नसल्याने चेहरे उपस्थित जनसमुदाय यांनी पाहिले आहेत. शिवरत्न बंगल्याकडे जाताना पालकमंत्री यांच्या शासकीय गाडीत मोहिते पाटील बसले परंतु फारसं लोकांना दिसलं नाही.

आली रे आली, आता माझी बारी आली, म्हणून तिघांनी मिळून गेम केली का ? अनावधानाने झाले, हे माहीत नाही. मात्र, घडलेला प्रकार जनता व अधिकारी यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधर्मपुरी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी.
Next articleAvast Review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here