सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवावी, वीज बील दुरुस्ती तत्काळ करावी व पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांस मदत करावी अन्यथा पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना जिल्ह्यात फिरकु देणार नाही, ही भुमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी घेतली होती. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा येताच जोरदार घोषणाबाजी करुन पालकमंत्र्यांना घेराव घालून निवेदन दिले. यावेळी वीज महावितरण अधिक्षक श्री. सांगळे यांना भरणे यांनी तत्काळ वीज कनेक्शन जोडून घेण्याचे आदेश दिले व त्यासोबतच तत्काळ वीजबिल दुरुस्ती करुन शेतकऱ्यांना वीजबिले सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त सुरज जाधव यांच्या कुटुंबीयांना मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेउन आर्थिक मदत जाहीर करू, असे सांगीतले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जि.संघटक गणेश सव्वासे, जि. संघटक रणजीत भाकरे-चव्हाण, नानासाहेब ढवळे, विठ्ठल आबा मस्के, संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ, करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, संपर्कप्रमुख गणेश शिंदे, माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, सतीश चांदगुडे ता. कार्याध्यक्ष, ता. संघटक नितीन मुळे, ता. संघटक बाळासाहेब वागज, सचिन खुळे शहराध्यक्ष टेंभुर्णी, वैभव माने शहराध्यक्ष करमाळा, श्रीकांत गायकवाड विभागप्रमुख, अभय पाटील गटप्रमुख पिंपळनेर, विशाल पाटील ता. उपाध्यक्ष, शंकर नागणे तालुकाध्यक्ष वि.आ., योगेश मुळे, महेश देशमुख, निखील जगताप, सुनील ढवळे, ज्ञानेश्वर पोळ, दत्तात्रय आरणे, अजय गायकवाड तालुकाध्यक्ष कामगार आ., ऋषिकेश फंड, आदित्य जाधव, समाधान थोरवे, आप्पा नाळे, किरण जाधव, अतुल लोकरे, सागर पाटील, तौफिक शेख, रणजीत सावंत, श्रीधर सावंत, लालासाहेब पाटील, चैतन्य नरळे, शैलेश देशमुख, सचिन सावंत, नानासाहेब कौलगे शाखाप्रमुख परिते, अंकुश जाधव परितेवाडी शाखाप्रमुख, अमोल जगताप, अविनाश नांगरे, सुरज देशमुख, सुदर्शन डांगे, सोमनाथ ढवळे, कुलदीप ढवळे, सागर रंदवे, आबासाहेब गोरे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng