पावसाळ्यातील वीजेपासून मनुष्य, पाळीव प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करा – सतीश कचरे, मंडळ कृषी अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

शेतकऱ्यांना विजांसह होणाऱ्या पावसाचा अंदाज कळावा, तसेच अंदाजाप्रमाणे शेती आणि शेतातील कामाचे यथोचित नियोजन करण्यासाठी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. दामिनी या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे शेतकरी बांधवांना वादळी पाऊस तसेच विजेच्या कडकडाटाचे पूर्वानुमान अर्धा ते एक तास आधी मिळणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले असून त्याच्या वापरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच शहरी भागातील विजेच्या कोसळण्यामुळे होणारे नागरिकांचे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे. उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी या मोबाईल अँप्लिकेशनसाठी लाईटनिंग लोकेशन मोडेल विकसित केले असून माहितीचे संकलन करण्यासाठी निरनिराळ्या भागात सेन्सर बसविले आहे.
दोनशे कि.मी. पर्यंत होणाऱ्या विजेच्या घडामोडी जाणून घेण्याची क्षमता ही प्रत्येक सेन्सरमध्ये आहे.

दामिनी या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शेतकरी तसेच नागरिकांना विजांच्या कडकडाटाचा अंदाज अर्धा तास आधी मिळत असल्यामुळे त्यांना शेतात काम करताना सुरक्षितस्थळी जाणे शक्‍य होणार आहे. वादळी वाऱ्यांबरोबर होणारा पाऊस आणि वीज कोसळण्याच्या संभाव्य आपत्ती टाळणे शक्‍य होणार आहे. यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करून वापर करण्याचे आवाहन शेतकरी व शेतमजूर बंधूनी करावे, असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.

दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी इथे लिंक करावे. https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवीज पडण्याआधी मिळणार आता सूचना, जीवित व वित्त हानी टळणार…
Next articleचि. सागर खुपसे आणि चि.सौ.कां. शितल गोरे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here