पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी विकास बबनदादा बोडके तर व्हॉइस चेअरमन पदी शालन मोहन गायकवाड यांची बिनविरोध निवड.

निरा नरसिंहपुर (बारामती झटका बाळासाहेब सुतार, याच्याकडून)


पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या स्थापनेपासून बिनविरोध निवड ही 71 वर्षाची परंपरा कायमची आहे.
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील माजी चेअरमन व प्रगतशील बागायतदार बबनदादा बोडके यांचे चिरंजीव विकास बोडके यांची  विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन  शालन मोहन गायकवाड यांची एक मताने बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर चेअरमन विकास बोडके बोलताना म्हणाले की  सोसायटीच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या आडचणीसाठी कर्ज वाटप व पीक कर्ज कोणताही प्रश्न आसतील ते मी सोडवण्यासाठी  प्रयत्नशील राहील चेअरमन विकास बोडके यांचे यावेळी उदगार,,,, माजी चेअरमन सुदर्शन बोडके व व्हाईस चेअरमन दशरथ कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे या दोन रिक्त जागेसाठी ही निवड झाली. चेअरमन पदाची निवड ही सहकारी कक्ष अधिकारी श्रेणी 1 श्री राऊत यांनी इंदापूर सहाय्यक निबंधक कार्यालयात केली. कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडकेदादांनी पिंपरी बुद्रुक पंचक्रोशी मध्ये सर्वसामान्य शेतकरी यांना विकास सेवा सोसायटी पासून  शेती पूर्वक कर्जाची सेवा सुविधा मिळावी म्हणून पिंपरी बुद्रुक येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा  आनली. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज, पिण्यासाठी पाणी व शेतीलाही पाण्याची सोय, इलेक्ट्रिक एम एस सी बी लाईट बोर्डची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आशा आनेक सुविधा कैलास वासी लोकनेते महादेवराव बोडकेदादा यांनी पिंपरी बुद्रुक मध्ये सुविधा करून दिल्या. नरसिंहपूर, गिरवी, टणु,  ओझरे, गोंदी, लुमेवाडी, या सर्व गावातील शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून शेतीसाठी कर्ज पुरवठा केला जात आहे. या निवडी प्रसंगी उपस्थित आनंताआबा बोडके, प्रभाकर बोडके, महादेव मगर, बबन दादा बोडके, नामदेव बोडके, श्रीकांत बोडके, चांगदेव बोडके, आशोकआबा बोडके, संतोष सुतार, पांडूदादा बोडके, रमेश मगर, शहाजीआण्णा बोडके, इतर सर्व सभासद व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या समाजासाठी राबविण्यात येणा-या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे सारथीचे आवाहन
Next articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओंकार मंगल कार्यालयाचा उद्घाटन समारंभ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here