पिंपरी (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते अधिनस्त पिंपरी पंचक्रोशीतील ६३ शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया, पीक विमा, हवामान आधारित फळपीक विमा, १०% रासायनिक खत बचत, डाळिंब पीन होल बोरर नियंत्रण, मका लष्करी अळी नियंत्रण, हुमणी अळी नियंत्रण या संयुक्त प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती मोहीमेत सहभाग नोदविला. गावचे प्रथम नागरिक संरपंच श्री. अविनाश कर्चे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. छगन कर्चे सोसायटी चेअरमन यांचे व बापू कर्चे, गेंडसर दादासो कर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत मारुती मंदीर सभा मंडपात श्री. अमित गोरे यांनी मका लष्करी अळी नियंत्रण, कु. मीरा दडस यांनी हुमणी अळी नियंत्रण, श्री. लालासाहेब माने यांनी अर्ज एक योजना अनेक महाडीबीटी व १०% रासायनिक खत बचत, श्री. गोरख पांढरे यांनी पीक विमा व हवामान आधारित फळपिक विमा योजना, श्री. सतीश कचरे यांनी जिराईत पीकासाठी मुलस्थानी जलसंधारण, मका व बाजरी बीजप्रक्रिया, डाळिंब पीन होल बोरर नियंत्रण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या विषयावर महिती मार्गदर्शन व सल्ला दिला.

या कार्यक्रमास पिंपरी पंचक्रोशीतील विकास कर्चे, महादेव कर्चे, हनुमंत कर्चे, प्रकाश कर्चे, नानासो कर्चे, पांडूरंग कर्चे व राहुल कर्चे हे प्रगतशिल शेतकरी उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन लालासाहेब माने यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता चहापान कार्यक्रमाने झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng