पिरळे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षामधून युवा नेते दिपक शिंदे सर इच्छुक…

दिपक शिंदे सर यांना भाजपने उमेदवारी द्यावी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

पिरळे ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीच्या गणरचनेत पिरळे पंचायत समिती गण साधारण जागेसाठी आरक्षित झालेला आहे सदरच्या गणामध्ये सामाजिक कार्यकर्ते युवा नेते दीपक शिंदे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मोहिते पाटील घराण्याची एकनिष्ठ असणारे स्वर्गीय मानसिंगराव शिंदे यांचे घराणे आहे या घराण्यातील युवा नेते दीपक शिंदे यांनी वारसा पुढे चालू ठेवलेला आहे भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक दीपक शिंदे आहेत दीपक शिंदे यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दीपक शिंदे यांना भाजपच्या अंतर्गत बंडाळी असल्यामुळे पिरळे गणात नाराजीचा सूर आहे. दीपक शिंदे सर्वांना मिळून मिसळून घेणारे मध्ये युवा कार्यकर्ते आहेत पक शिंदे यांना भाजपने पिरळे गाणातून उमेदवारी द्यावी अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. पिरळे गणांमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीयांवर वर्चस्व आहे. पिरळे गणातील कुरभावी,एकशिव ,तांबेवाडी, पिरळे, कळंबोली, बागर्डे, पळसमंडळ, गावे आहेत. दिपक शिंदे यांचा गणातील गावांमधील नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याशी दांडगा जनसंपर्क आहे मोहिते पाटील परिवार व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक विकास कामे करण्यासाठी दीपक शिंदे यांनी प्रयत्न केलेले आहेत.
दीपक शिंदे सारख्या जनसंपर्क व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवा नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाकडून पिरळे पंचायत समिती गणामध्ये संधी द्यावी असे भाजपच्या कार्यकर्त्यातून मागणी होत आहे दीपक शिंदे यांच्या उमेदवारीमुळे फोंडशिरस जिल्हा परिषद गट व पिरळे पंचायत समिती गणामध्ये भाजपला फायदा होऊ शकतो असे मतदारांच्या मधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहोलार समाजास माळशिरस पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी – युवा नेते दत्ताभाऊ ढोबळे.
Next articleअत्यंत आनंदाची बातमी : माळशिरसच्या पै. श्रद्धा खरात कन्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here