पिलीव गावात एमएसएमबी लाईटच्या मीटरचे ग्राहक कोमात तर, आकडेवाले नागरिक जोमात.

वीज ग्राहकांना मीटरपेक्षा आकडा बरा म्हणण्याची वेळ अधिकारी व वायरमन यांनी आणलेली आहे.

पिलीव ( बारामती झटका )

पिलीव गावात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत घरगुती लाईटचे मिटर घेणारे ग्राहक कोमात आहेत तर, अधिकारी व वायरमन यांना हाताशी धरून बेकायदेशीर आकडा टाकणारे आकडेवाले नागरिक जोमात आहेत. वीज ग्राहकांना मीटर पेक्षा आकडा बरा होण्याची वेळ अधिकारी व वायरमन यांनी आणलेली असल्याची पिलीव परिसरात चर्चा सुरू आहे.

पिलीव येथून अनेक गावांत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचा कारभार सुरू आहे. शाखा अभियंता व अनेक वायरमन, लाईटमन कर्मचारी कार्यरत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना घरगुती व शेतीच्या लाईटच्या अडचणी येऊ नये, यासाठी नेमणूक केलेली असते. अनेक ग्राहक रीतसर घरातील मीटर अधिकृत घेऊन वीज वापरत असतात. शेजारी बेकायदेशीर आकडा टाकून अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे राजरोसपणे बेकायदेशीर आकड्यावर लाईट सुरू असते. मिटर घेणाऱ्या लोकांना युनिट प्रमाणे पाचशे, हजार, दीड हजार, दोन हजार अशी बिले येत असतात. ग्राहक वेळेवर बील भरत असतात. आकडेवाले ठरलेली रक्कम कर्मचारी त्यांच्याकडे जमा करीत असतात.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत. अशा अडचणीच्या काळामध्ये मीटर वापरणारे ग्राहक यांच्या आर्थिक अडचणीमुळे विज बिल एक महिना जरी भरण्याचे थांबले तरी वीज कनेक्शन कट करण्याची भाषा बोलली जाते. मात्र, चिरीमिरीवर राजरोसपणे आकडेवारी लाईट वापरीत असतात त्यामुळे मिटर घेणाऱ्यांची मानसिकता दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. मीटरपेक्षा आकडा बरा म्हणण्याची वेळ वीज ग्राहकांवर आलेली आहे. यासाठी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिलीव परिसरातील अनधिकृत आकडे बंद करावेत अथवा मीटर ग्राहकांना सुद्धा आकडा टाकण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीने जोर धरलेला आहे.

वरिष्ठ याकडे कोणत्या नजरेने पाहतात यावर अवलंबून आहे. जर आकडेवाले यांची वेळेवर रसद मिळत असेल तर दुर्लक्ष होईल आणि पिलीव परिसरातील मीटरचे ग्राहक आकडेवाले होतील, अशी नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकांना वाटत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleइस्लामपूर येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन
Next articleआयुष भारत अंबाजोगाई तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here