पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव पत्रकार संघाच्या सन २०२२ ची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी शुभजित नष्टे तर उपाध्यक्षपदी गणेश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी शाहरुख मुलाणी, कार्याध्यक्षपदी रघुनाथ देवकर, संघटकपदी संजय रोकडे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारणी सदस्य म्हणून जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे, संजय पाटील, प्रमोद भैस, उदय कदम, अतुल नष्टे, सुजीत सातपुते, अभिजीत तावरे, विश्वजीत गोरड हे काम पाहणार आहेत. यावेळी सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या निवडीनंतर नुतन अध्यक्ष शुभजित नष्टे बोलताना म्हणाले कि, पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणार आहे. तसेच पदाचा वापर सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी करणार असल्याचे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचा सत्कार पिलीव ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर, ग्रामपंचायत सदस्य जिवन गुरव, निसार मुलाणी, ॲड. सत्यजित गलांडे, तानाजी लोखंडे यांच्याहस्ते करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng