पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सा.माळशिरस टाईम्स या वृत्तपत्राचे मुख्य संपादक सुजित दिगंबर सातपुते यांना आज बुधवार दि. ५ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्यावतीने आदर्श पत्रकार या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकारीता एक वसा, एक चळवळ, ध्येय, ध्यास समजून सर्व सामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी सुजित सातपुते यांनी आजपर्यंत आपल्या लेखनीच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवून पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. पिलीवसह परिसरातील ग्रामीण भागातील विविध समस्यांविषयी जागृत राहून संबंधित प्रशासनास शासकीय काम करण्यासाठी भाग पाडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची सातपुते महत्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा यशवंतजी पवार व प्रदेश सचिव डॉ. आशिषकुमार सुना यांच्या मार्गदर्शनखाली आज सुजित सातपुते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ॲड. सत्यजित गलांडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस, चेअरमन अविनाश जेऊरकर, तंटामुक्ती अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे, माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे, ग्रा.पं. सदस्य जीवन गुरव, तानाजी लोखंडे, निसार शेख यांसह पिलीव पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng