पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते 1 कोटी 38 लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन व उदघाट्न करण्यात आले.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार राम सातपुते,भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते-पाटील,कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार,पंचायत समिती सभापती शोभाताई साठे,मा.उप सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,उपसभापती प्रतापराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील,सुनंदा फुले,राहुल बापू वाघमोडे,भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल मदने,पंचायत समिती सदस्य ताई महाडिक,पिलीव सरपंच नितीन मोहिते, उपसरपंच संजय आर्वे,शिवामृत दुध संघांचे संचालक दादासाहेब शिंगाडे,दत्तात्रय आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
3054 या योजनेतून कारंडे वस्ती,लक्ष्मी रोड,जरग वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,आमदार फंडातून सठवाई रोड डांबरीकरण करणे,दलितवस्ती सुधार योजनेतुन भीमनगर समाज मंदिर बांधणे, लोखंडे वस्ती रस्ता काँक्रीट करणे,सातपुते वस्ती करडे वस्ती पाण्याची टाकी बांधणे, भूमीगत गटार बांधणे, नागरी सुविधा योजनेतून पिलीव करांडे वस्ती डांबरीकरण,सुनील खुर्द वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,जिल्हा परिषद शिक्षण विभाग मधून मुलींची शाळा,जगरवस्ती शाळा नवीन खोली बांधणे, जगरवस्ती जि.प. शाळा ऑल कंपाउड बांधकाम करणे,पिलीव शाळा पेव्हर ब्लॉक बसवणे, 15 वा वित्त आयोग योजनेतून महादेव मंदिर ऑल कंपाउड बांधकाम करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा कामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मळोलीचे चंद्रकांत जाधव,चेअरमन अविनाश जेऊरकर,समशेरसिंग राजपूत,सरपंच संघटना अध्यक्ष सचिन पाटील,पिलीव ग्रा.पं सदस्य जिवन गोरे,झिंजेवस्तीचे सरपंच राहुल जावळे,कुसमोडचे सरपंच तुषार लवटे,महेश काळे,रणधीरसिंग जामदार,शंकर काळे,बाळासाहेब फुले, ब्रह्म्देव लोखंडे, सुनील खुर्द,महादेव लोखंडे,प्रवीण वाघमारे, युवराज सातपुते,आप्पा लोखंडे, तानाजी लोखंडे,सौ.सुषमा जामदार, ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर,विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य व पिलीव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन रघुनाथ देवकर यांनी केले व आभार प्रदर्शन जि. प सदस्य गणेश पाटील यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng