पिलीव (बारामती झटका)
पिलीव ता. माळशिरस येथे नाभिक सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे नाभिक समाजातील युवकांनी श्री संत सेना महाराज जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, बचेरी, शिंगोर्णी, चांदापुरी येथील भजनी मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे भजनाचा कार्यक्रम करून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये व विठ्ठल नामाच्या जय घोषामध्ये श्री संत सेना महाराजांचे प्रतिमेस सुगंधी पुष्पांनी समाज बांधवांनी भगिनींनी व गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील असंख्य नेते मंडळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गावच्या पश्चिमेस लक्ष्मीनगर मधील देवकर वस्ती वरती ही भजनाच्या तालामध्ये सालाबादप्रमाणे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी अतिशय भक्तिमय वातावरणात साजरी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
