पिसेवाडीचे ग्रामसेवक बनकर यांच्या कारकिर्दीतील कामांची सखोल चौकशी करण्याचे गटविकास अधिकारी यांचे आदेश.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश..

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बनकर कायमस्वरूपी गैरहजर व त्यांच्या कारकिर्दीमधील कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी श्री. खरात यांना दिलेले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष व पिसेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य साहिल आतार यांनी दि. 22/02/2023 रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला होता. सदरच्या अर्जावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल आतार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मावळ्यांनी आक्रमक होऊन माळशिरस पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गट विकास अधिकारी किरण मोरे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन धरून जोपर्यंत न्याय भेटत नाही,, तोपर्यंत कार्यालयाचा ताबा सोडला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतलेली होती. सदरच्या अर्जावर काय कारवाई झालेली आहे, याची सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी संबंधित विभागाकडून माहिती घेतली आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. के. वी. खरात यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून सदर पत्राची प्रत ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार व पिसेवाडीच्या ग्रामस्थांना देण्यात आलेली आहे.

सदरच्या पत्रामध्ये संदर्भीय पत्र या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. सदर पत्रामध्ये पिसेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पिसेवाडी ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी गैरहजर असले बाबत व त्यांच्या कारकिर्दीमध्ये कामाची सखोल चौकशी व्हावे, असे नमूद केलेले आहे. तरी सोबतच्या पत्राचे अवलोकन करता आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून शासन निर्णयानुसार योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल चार दिवसात स्वयं स्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास चौकशी अहवाल सादर करावा असे पत्र दिलेले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी कायम आंदोलने, मोर्चे ठिय्या आंदोलन अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देत आहेत. पिसेवाडी ग्रामपंचायतमधील अनेक लोकांच्या तक्रारी व अडचणी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस पंचायत समितीमध्ये आक्रमक झालेली होती. शेतकरी संघटनेच्या मावळ्यांचा आक्रमकपणा पाहून पंचायत समितीकडून चौकशीचे आदेश दिलेले असल्याने चौकशीसाठी नेमणूक केलेले विस्तार अधिकारी खरात काय अहवाल देतील, याकडे माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशैक्षणिक संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा
Next articleकांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याची जिल्हाप्रमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here