पिसेवाडीतील माळी समाजाची पैशापेक्षा पक्ष व नेत्यांवरील निष्ठा श्रेष्ठ ठरली.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा पिसेवाडीतील कार्यकर्त्यांचा आदर्श घ्यावा.

पिसेवाडी ( बारामती झटका )

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत पिसेवाडी गावातील माळी समाजाच्या मतदारांनी विरोधकांच्या पैशापेक्षा मोहिते पाटील यांच्या पक्ष व नेत्यांच्या निष्ठेला जास्त महत्व दिलेले असल्याने पैशापेक्षा निष्ठा श्रेष्ठ ठरलेली आहे. वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील पिसेवाडीतील कार्यकर्त्यांचा आदर्श तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घ्यावा असा आहे.

पिसेवाडी गावचे युवा नेते माजी सरपंच सुरेश पिसे, युवा नेते विद्यमान सरपंच अण्णासाहेब शेंडे, शिवामृत दूध संस्थेचे संचालक भागवत बाबुराव पिसे, संग्राम दूध संस्थेचे चेअरमन रामचंद्र पिसे यांची सोसायटीच्या निवडणुकीविषयी चर्चा करताना सांगितले. पिसेवाडी गावामध्ये राजकारण करीत असताना सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्ष नेते धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकास कामे व शासकीय योजना राबविल्या जात असतात. मोहिते पाटील यांनी गावामध्ये विकास करीत असताना कोणत्याही प्रकारे दुजाभाव कधीही केलेला नाही. कार्यकर्त्यांना पाठबळ देत असतात. अशा नेत्यांच्या पाठीमागे ठाम राहणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे पिसेवाडीचे माजी सरपंच सुरेश पिसे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी गटाकडून लाखो रुपयांचे आमिष दाखवले होते. परंतु, लाख मोलाचा शब्द पाळणारे नेते असल्यानंतर आम्हाला लाख रुपयाची काय गरज, असा मनामध्ये स्वाभिमान जागृत करून विरोधकांना राम राम केला. खऱ्या अर्थाने वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पिसेवाडी येथील माळी समाजाची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. पिसेवाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळापूर येथील मतदानसुद्धा व्यवस्थित करून सेवा सोसायटीची निवडणूक जिंकलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून नो कंम्प्लेंन डे टीमचा केला सन्मान
Next articleधर्मपुरी येथे ह.भ.प. गणेश महाराज वारिंगे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here