पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी हेमंत कांबळे तर युवक तालुकाध्यक्षपदी संतोष गायकवाड यांची निवड

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) च्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी हेमंत कांबळे तर युवक तालुकाध्यक्षपदी संतोष गायकवाड यांची निवड पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर करून निवडीचे पत्र दिले.

राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या आदेशाने दि. ३१ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह, अकलूज येथे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माळशिरस तालुकाध्यक्षपदी हेमंत कांबळे, युवक तालुकाध्यक्षपदी संतोष गायकवाड, तालुका सरचिटणीसपदी दयानंद कांबळे तालुका संघटकपदी पांडुरंग चव्हाण, तालुका खजिनदारपदी विश्वास उघडे, युवक तालुका संपर्क प्रमुखपदी शिवम गायकवाड यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर करून निवडीचे पत्र देऊन सत्कार केला.

यावेळी नूतन तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे व युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून अकलूजसह माळशिरस तालुक्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद वाढवणार असल्याचे सांगितले. यावेळी सचिन कांबळे, शिवाजी खडतरे, उमेश वाघमारे, कोहिनुर चव्हाण, शहाजी खडतरे, अमोलराजे भोसले, अशोक कोळी, राजू बागवान, रवी कोळी, अर्जुन कोळी, ऋतुराज थोरात, अनिकेत शिंदे, अजय साळुंखे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुधीर शामराव भोसले यांची आर.पी.आय. युवक आघाडीच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड
Next articleपिसेवाडी गावातील स्मशानभूमीतील हातपंप, पथदिवे तात्काळ दुरुस्त करण्याची स्वाभिमानीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here