पी-एम किसान मानधन योजना केवायसीसाठी ४ दिवस बाकी…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील पी – एम किसान मानधन योजनेत पात्र असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना श्री‌ सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी, माळशिरस यांचेकडून आवाहन करण्यात येते की, पी -एम किसान मानधनसाठी E- KYC व बँक खात्याशी आधार लिंक करण्याची शेवटची मुदत ३१ ऑगस्ट आहे. तरी त्वरा करा.

E – KYC साठी पी – एम किसान पोर्टल www.pmkisan.gov.in वर किंवा पी – एम किसान ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. या पोर्टल वेबसाईट किंवा ॲपवर जाऊन फार्मर कॉर्नरला जाऊन E -KYC क्लीक करावे व आधार क्रमांक टाकून आधार कार्ड नोंदणी व मोबाईल क्रमांक भरावा. नोंदणीकृत मोबाईल वरील ओ.टी.पी (OTP ) भरावा व तद्नंतर आधार नोदणी मोबाईल वर आलेला ओ.टी.पी. ( 0TP ) भरा व सबमिट करा. तद्नंतर E – KYC समाविष्ठ झालेचा संदेश येईल. तरी सर्व पी एम किसान पात्र लाभार्थ्यांनी E- KYC करून मानधन लाभास वंचीत राहू नये, असे कृषि विभागाचे आवाहन आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुरवठा उपआयुक्त श्री. कुलकर्णी यांचा सन्मान सहकार महर्षी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेकडून संपन्न…
Next articleइंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाडचा समावेश करण्याची मागणी, केंद्रीय उद्योग मंत्र्यांना शिष्टमंडळ आग्रही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here