बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात ढोले सर ठरवतील तोच उमेदवार निवडुन येणार…
इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या संचालक पदासाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून इंदापूर तालुक्यातून जिल्हा बँकेसाठी दोन जागा असतात. यामध्ये अ वर्ग आणि ब वर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. अ वर्गातुन पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी श्रीमंत ढोले सर यांच्या नावाची चर्चा ग्रामीण भागातील गावागावातून होताना दिसून येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करून या भागातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत ढोले यांनी अनेक सार्वजनिक विकासाची कामे केली आहेत. तसेच या भागात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे मोठे कार्य सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील मोठे राजकीय वजन असलेले लोकप्रिय नेतृत्व आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत श्रीमंत ढोले ठरवतील तोच उमेदवार नक्कीच निवडून येईल असेच या भागातील जनतेमधून चर्चा केली जात आहे.
पुणे जिल्हा बँकेसाठी अ वर्ग गटातून प्रामुख्याने विकास सोसायटी मतदारसंघातून १३ संचालक निवडून येतात. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे हे उमेदवार आहेत. यातूनच श्रीमंत ढोले सर यांचे नाव ग्रामीण भागातील जनतेमधून चर्चेस येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा सहकारी बँकेसाठी श्रीमंत ढोले संचालक पदासाठी निवडणूक लढवतात का ? भाजपमधून उमेदवारी मिळणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणारा काळच देईल.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng