पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा

पुणे (बारामती झटका)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

भूमिपूजन समारंभ

रा.म. 548 डीडी वरील पुणे शहरातील कात्रज चौक उड्डाणपुल लांबी 1.326 किमी, किंमत 169 कोटी रुपये

रा.म. 60 वरील इंद्रायणी नदी ते खेड मार्गाचे सहापदरीकरण लांबी 17.17 किमी, किंमत 1269 कोटी रुपये

        पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण

रा.म. 548 डी वरील शिक्रापूर ते न्हावरा रस्त्याचे सुधारीकरण लांबी 28 किमी, किंमत 46 कोटी रुपये

रा.म. 548 डी वरील न्हावरा ते आढळगाव रस्त्याचे उन्नतीकरण लांबी 48.45 किमी, किंमत 312 कोटी रुपये

खेड घाट रस्त्याची व रा.म. 60 वरील खेड सिन्नर रस्त्यावरील नारायणगाव बायपासची पुर्नरचना लांबी 9.32 किमी, किंमत 285 कोटी रुपये

        पुणे जिल्ह्यातील केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत रस्त्यांचे सुधारीकरण

1. रा.मा. 106 महाड मेढेघाट वेल्हे नसरापूर ते चेलाडी फाटा 16 किमी, किंमत 4.81 कोटी रुपये

2. रा.मा. 103 उरण पनवेल भिमाशंकर वाडा-खेड-पावळ-शिरुर 10 किमी, किंमत 3.91 कोटी रुपये

3. रा.मा. 126 मुंबई-पुणे रस्ता (वडगाव येथील अंतर्गत रस्ता लांबी) ता. मावळ 1.90 किमी, 3.99 कोटी रुपये

4. रा.मा. 134 दौंड (जि. पुणे) ते गार (जि. नगर) वर भिमा नदी वरील पुल 160 मी, 20 कोटी रुपये

5. प्र.जि.मा. 62 चांबळी कोडीत नारायणपूर बहिरवाडी काळदरी रस्ता 12 किमी, 4.91 कोटी रुपये

6. प्र.जि.मा. घोडेगाव नारोडी-वडगाव काशिंमबेग साकोरे कळंब रस्त्यावरील मोठा पुल ता. आंबेगाव 140 मी, 7.22 कोटी

7. प्र.जि.मा. 65 बारामती-जळोची- कन्हेरी लकडी-कळस लोणीदेवकर रस्ता 15 किमी, 4.91 कोटी

8. प्र.जि.मा. 114 कारेगाव करडे निमोणे रस्ता 5.60 किमी, 3.93 कोटी रुपये

9. प्र.जि.मा. 149 ओतूर ब्राह्मणवाडा रस्ता 10.50 किमी, 3.90 कोटी रुपये

10. प्र.जि.मा. 56 हडपसर मांजरी वाघोली कॉक्रीट रस्ता 3.50 किमी, 3.85 कोटी रुपये

11. प्र.जि.मा. 34 केशवनगर लोणकर पाडळ मुंढवा रस्ता 2.50 किमी, 2.20 कोटी रुपये

12. प्र.जि.मा. 61 सासवड राजुरी सुपा रस्ता, 6 किमी, 4.91 कोटी रुपये

13. प्र.जि.मा. 169 वरकुटे (खु.) वडपुरी गलोटे वाडी नं. 2 सरदेवाडी ते रा.म. 65 रस्ता 6 किमी, 4.91 कोटी रुपये

14. प्र.जि.मा. 12 वाडा (ता. खेड) घोडा (ता. आंबेगाव) रस्ता 9 किमी, 2.72 कोटी रुपये

15. प्र.जि.मा. 31 डेहने नाईफड (ता. खेड) पोखरी (ता. आंबेगाव) रस्ता 5.50 किमी, 1.97 कोटी रुपये

16. अ) ग्रा.मा. 66 रा.मा. 103 ते खंडोबामाळ निमगाव रस्ता व ब) प्र.जि.मा. 19 निमगाव दावडी रस्ता 12.60 किमी, 24.20 कोटी रुपये

17.      निमगाव खंडोबा येथील हवाई रोपवे चे सर्व सोयींसह सुधारीकरण व इतर बांधकामासह रोपवे करणे 31.81 कोटी रुपये

एकूण : 14 रस्त्यांची कामे, 2 पूल, 1 रोपवे 116.40 किमी, 134.18 कोटी रुपये

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुणे विभागातील 19 लाख 28 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Next article23 ते 25 ऑक्टोबरला जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम.परीक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here