नातेपुते ( बारामती झटका )
सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्यामार्फत पुणे-पंढरपूर रोडपासून धर्मपुरी बंगला ते गुरसाळे दहिगाव या रस्त्याचे अंदाज पत्रकाप्रमाणे काम झालेले नसून निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याचे भारतीय नवनिर्माण लहुजी सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब रणदिवे यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दळणवळणासाठी सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा धर्मपुरी बंगला ते गुरसाळे दहिगाव या रस्त्यावर जनतेची येण्या-जाण्याची अडचण होती. सदरच्या रस्त्यावरून बारामती वालचंदनगर येथे गडकरी जाण्यायेण्यासाठी नागरिकांची अडचण असल्याने सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने अंदाज पत्रकाप्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे केलेले दिसून येत आहे. रस्त्यावर ठेकेदार यांनी अतिशय खराब रस्ता केलेला आहे. सदरचा रस्ता त्वरित अंदाज पत्रकाप्रमाणे करावा अन्यथा आंदोलन करून सदरच्या रस्त्याचा ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असा इशारा नानासाहेब रणदिवे यांनी दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng