पुणे विभागातील 19 लाख 30 हजार 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 19 लाख 84 हजार 830 रुग्ण – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे (बारामती झटका) 

पुणे विभागातील 19 लाख 30 हजार 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 84 हजार 830 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 722 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 973 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.24 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 34 हजार 318 रुग्णांपैकी 11 लाख 8 हजार 432 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 120 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.72 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 47 हजार 98 रुग्णांपैकी 2 लाख 37 हजार 317 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 535 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 963 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 435 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 576 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 952 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 548 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 377 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 903 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 574 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 560 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 350 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 769, सातारा जिल्ह्यात 238, सोलापूर जिल्ह्यात 190, सांगली जिल्ह्यात 105 तर कोल्हापूर जिल्ह्यात 48 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 317 आहे. पुणे जिल्हयामध्ये 605, सातारा जिल्हयामध्ये 296, सोलापूर जिल्हयामध्ये 230, सांगली जिल्हयामध्ये 163 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 23 रुग्णांचा समावेश आहे.

 पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 66 लाख 83 हजार 377 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 84 हजार 830 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअन्न व औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्हयातील गुऱ्हाळ मालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
Next articleमाळशिरसमध्ये गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांची आत्मचिंतन बैठक संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here