नातेपुते (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मुंबई येथे उत्साहात साजरी होणार असून त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात मुंबई येथे यावे असे आवाहन ॲड. प्रशांत रुपनवर यांनी आज नातेपुते येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषद माध्यमातून समाज बांधवांना केले.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष जयंती साजरी न करता आल्यामुळे या वर्षी प्रचंड उत्साहात राज्याचे धनगर समाजनेते मा. गणेशदादा हाके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या के. सी. कॉलेज येथे जयंतीचे नियोजन केले आहे.

यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, देशाचे अर्थमंत्री भागवतराव कराड साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब, महाराष्ट्राचे इतर मागास व कल्याण मंत्री विजयराव वडेट्टीवार साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, आमदार अशिष शेलार, राज्यसभा खासदार विकास महात्मे साहेब, माजी मंत्री एम. एम. रेवण्णा साहेब, माजी मंत्री विश्वनाथ साहेब, गुजरातचे माजी खासदार सागर रायका साहेब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते ॲड. प्रशांत रुपनवर यांनी समाजबांधवांना केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng