पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या सदस्यपदी नागेशमालक वाघमोडे यांची निवड…

श्री विठ्ठल रुक्मिणी उद्योग समूहाचे संस्थापक नागेशमालक वाघमोडे यांना संधी मिळाली…

माळशिरस ( बारामती झटका)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणी समितीच्या सदस्यपदी श्री विठ्ठल रुक्मिणी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तिरवंडी गावचे युवानेते श्री. नागेशमालक वाघमोडे यांची निवड उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी केलेली असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी उद्योग समूहाचे संस्थापक नागेशमालक वाघमोडे यांना तालुक्यातून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक म्हणून संधी मिळालेली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची देशाच्या इतिहासामध्ये एक उत्तम प्रशासक, पराक्रमी सेनानी, न्यायप्रविष्ठ व्यक्ती, त्याचबरोबर असंख्य जन कल्याणकारी कार्य करणारी लोकमाता म्हणून ओळख आहे. अशा या थोर स्त्रीरत्नाचे नाव सोलापूर विद्यापीठास देण्यात आले आहे.
विद्यापीठाची कोंडी, ता. उत्तर सोलापूर या परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर इमारतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणी करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून तसेच जिल्ह्यातील स्थानिक सामाजिक संघटना व विविध घटकांकडून विद्यापीठाकडे मागणी होत असल्याने विद्यापीठाने सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठ व शासन यांच्या संयुक्त सहभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणी करण्याच्या अनुषंगाने दि. 23/08/2021 रोजीच्या शासन निर्णयाअन्वये समिती गठीत करण्यात आली होती. सदरची समिती शासन निर्णयातील प्रशासकीय सदस्यांच्या नियुक्ती या रद्द करून नव्याने सदस्यांची समिती पुनर्गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पालकमंत्री सोलापूर अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू कार्याध्यक्ष तर श्री. नारायण गोविंदराव पाटील, श्री‌ बापू हटकर, श्री. शिवाजी ज्ञानदेव बंडगर, श्री‌ बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, श्री. मोहन नागनाथ हळणकर, श्री. शिवदास कचरूभा बिडकर, श्री. शिवाजी अंबादास कांबळे, श्री. सुभाष प्रल्हाद मस्के, श्रीमती समता गावडे – सोनटक्के, श्री. नागेश हनुमंत वाघमोडे, श्री. अमोघसिद्ध उर्फ अमोल रामचंद्र कारंडे, श्री. शरणू शिवराय हांडे, श्री. बापू दादा मेटकरी, श्री‌ सोमेश नागनाथ क्षीरसागर अशी नूतन सदस्य तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव हे समन्वय आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे ह‌.भ.प. अजित कुरळे महाराज, सराटी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे..
Next articleसावधान सरपंचांनो, भ्रष्टाचार व शासकीय निधीचा अपहार कराल तर जेलमध्ये जाल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here