पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे दु:खद निधन

लढवय्या नेता हरपला…

पुणे (बारामती झटका)

पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते.

शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गिरीश बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.

खा. गिरीश बापट यांचा संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास आहे. टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. खा. गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून सुरुवात केलेले गिरीश बापट १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला.

खा. गिरीश बापट यांना बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची वैशिष्ट्यपूर्ण योजनेत दमदार कामगिरी…
Next articleशंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार, औपचारिक घोषणा बाकी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here