पुण्याला पोहोचा फक्त ५५ रुपयात…

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडी सुरू

सोलापूर (बारामती झटका) लोकमत साभार

कोरोना काळात बंद करण्यात आलेली सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बस, खाजगी ट्रॅव्हल्सपेक्षा सर्वसामान्यांचा सोलापूर ते पुणे हा प्रवास आता अगदी स्वस्तात होणार आहे. तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर रेल्वेची प्रवासी सेवा पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन बंद असलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. एक्सप्रेस, मेल, मेमूसह पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या नियमित प्रवाशांची संख्या मोठी आहे. नोकरदार, विद्यार्थी, पुणेरी सोलापूरकरांचे नातेवाईक, कामानिमित्त ये-जा करणारे लोक त्यामुळे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला मागील दोन ते तीन दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जाणून घ्या गाडीची वेळ
सोलापूर-पुणे ही गाडी सोलापुरातून दुपारी ११.४० वाजता सुटेल आणि सायंकाळी ७.२५ वाजता पुण्यात पोहोचणार आहे. शिवाय पुण्याहून ही गाडी रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता सोलापुरात पोहोचणार आहे. ब्लॉक किंवा क्रॉसिंगसाठी गाडीला पोहोचण्यासाठी वेळ लागू शकेल. अन्यथा ही गाडी वेळेवर धावणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

असे आहेत तिकिटाचे दर
प्रवास – सोलापूर ते पुणे
जनरल क्लास – प्रति प्रवासी ५५ रु.
स्लीपर कोच १८५ रु.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआई-वडिलांचे उपकार कधीही विसरू नका, आपले जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही – ह.भ.प. गणेश महाराज भगत नातेपुतेकर
Next articleविरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची गुजरात येथे होणाऱ्या 36 व्या नॅशनल स्पर्धेतील खेळाडूंच्या गेम्स कॅम्पला सदिच्छा भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here