पुरंदावडे (बारामती झटका)
पुरंदावडे ता. माळशिरस येथे संजीवन फाउंडेशनच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मस्य, मृदु, वने व पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सोलापूर जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर व सोलापूर जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य सुरेशराव पालवे यांच्या शुभहस्ते दिव्यांगांसाठी साहित्य वाटप, कोरोना योद्धांचा सन्मान तसेच नवनिर्वाचित नगरसेवक आणि सरपंच यांचा सत्कार रविवार दि. २३ जानेवारी २०२२ रोजी सायं. ५ वा. हॉटेल श्रीनाथ, पालखी मैदान शेजारी, पुरंदावडे, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

दिव्यांगांसाठी असणारे साहित्य कानाची मशीन, व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, वॉकर, काठी आणि चष्मे या वस्तूंसाठी दि. २१ जानेवारी २०२२ पर्यंत मो. ९३०७०४२७०४, ९९२२९५८६८३, ९७६६७७५००९ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संजय देवगुंडे, कार्याध्यक्ष बापू सरक, उपाध्यक्ष प्रशांत पाटील आणि सचिव तुषार कोळेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा आणि बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng