पुरंदावडे ( बारामती झटका )
बुधवार दिनांक २८/०४/२०२२, दुपारी १२:३० वाजता या ग्रामपंचायत चे सरपंच देविदास ढोपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंचपदाची निवड पार पडली यावेळी उपसरपंच पदी सौ. सुनीता कुंडलिक पालवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ए. एम. सरवदे ( कृषी – पंचायत समिती, माळशिरस साहेब ) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविली होती. त्यांना तलाठी गुंजाळ भाऊसाहेब ग्रामसेविका श्रीमती जे. एम. दिक्षीत व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यावेळी १) सरपंच देविदास ढोपे २) सागर ओवाळ ३) सौ.नंदा गरगडे ४) श्रीरंग नाळे ५) सौ. अर्चना मोहिते ६) भगवान पिसे ७) सौ. आरती ओवाळ ८) बाळासाहेब सुळे ९) सौ. कमल पालवे १०) सौ. पद्मिनी बोराटे ११) माजी उपसरपंच संतोष शिंदे, तसेच वस्ताद ज्ञानदेव पालवे, वसंत ढगे, विठ्ठल तात्या अर्जुन, संचालक धोंडीराम नाळे, चेअरमन रामचंद्र गोरे, ज्ञानदेव निंबाळकर, तुकाराम ढगे, ज्ञानदेव चव्हाण, तुकाराम नाळे, शशीकांत नाळे, रघु बोराटे, बबन सुळे, हनुमंत ओवाळ, श्रवण ओवाळ, बाळासाहेब सालगुडे, हरी राऊत, बापू घाडगे, नारायण पालवे, सागर पालवे, अमोल पालवे, चंद्रकांत मोहिते, तानाजी ओवाळ, बाळू ओवाळ, नामदेव पवार, कुंदन पालवे, पोपट पालवे, नाना पालवे, दादा पालवे, कुंडलिक नाळे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng