पुरंदावडे येथील श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थानला आ. राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून “ब” वर्ग दर्जा मिळून दोन कोटीचा आराखडा मंजूर

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार कामगिरी.

पुरंदावडे ( बारामती झटका )

पुरंदावडे ता. माळशिरस येथील ग्रामदैवत व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थानला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा मिळून दोन कोटी रुपयाचा निधी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास व जलसंधारण विभागाने मंजूर केलेला असल्याची माहिती श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते हरिभाऊ पालवे यांनी दिली आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर पुरंदावडे येथील ग्रामदैवत, अनेक भाविकांचे श्रद्धा स्थान असणारे जागृत देवस्थान श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान माळशिरस पासून सात किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. पुरंदावडे गावानजीक मेडद, सदाशिवनगर, जाधववाडी, मांडवे यांच्यासह अनेक छोटीमोठी गावे वसलेली आहेत. सदर गावातील भाविक दैनंदिन दर्शनासाठी व यात्रेच्या वेळेस येत असतात.

श्री महालक्ष्मी देवस्थान प्राचीन काळातील आहे. महालक्ष्मी देवी जागृत असून नवसाला पावणारी आहे. या देवीचा उत्सव पुरंदावडे गावासह आसपासच्या गावातील लोक एकत्र येऊन साजरा करीत असतात. या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पंचमीच्या वेळेस तीन दिवस व फेब्रुवारी महिन्यात माघ शुद्ध पौर्णिमेच्या वेळी चार दिवस यात्रा भरते. वर्षातून सात दिवस यात्रेचा कालावधी असतो. यात्रेच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी गोड नैवेद्य, दुसऱ्या दिवशी देवीला महानैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी रथाची मिरवणूक काढली जाते. गावांमधून छबिना, मिरवणूक, वाजत गाजत भक्तिमय वातावरणामध्ये काढली जाते. यात्रेच्या निमित्त बैलगाडी शर्यत व भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जाते. फेब्रुवारी महिन्यात माघशुद्ध पौर्णिमेच्या वेळी रथाची मिरवणूक काढून गोड नैवद्य, महाप्रसाद व कुस्त्यांचे आयोजन करून यात्रेची सांगता केली जाते.

पुरंदावडे येथील श्री महालक्ष्मी देवीचे खूप महात्म्य आहे. पिलीव येथील यात्रेला पालखी व रथ पिलीव येथे गेल्या शिवाय पिलीवच्या यात्रेला सुरुवात होत नाही, असा मान पुरंदावडे येथील श्री महालक्ष्मी देवीचा आहे. पुरंदावडे गावासह आसपासच्या गावातील श्रद्धास्थान असणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शन विना एकही दिवस भाविकांचा जात नाही कोणत्याही शुभकार्यासाठी श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय अनेक भाविक आपल्या कार्याला बाहेर पडत नाहीत.


श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान दिवसेंदिवस भाविकांचे श्रद्धास्थान बनत असलेल्या देवस्थानच्या मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुख सोयीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. संगीताताई संजय मोटे यांनी तिर्थक्षेत्र विकासनिधी मधून हायमास्ट दिवा दिलेला होता. तत्कालीन विधान परिषदेचे आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी विशेष प्रयत्न करून सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेकडून दि. 30 डिसेंबर 2016 रोजी श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थानला तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिलेला होता. भाविकांच्या सोयीसाठी 3 लाख रुपये पाण्याच्या टाकीसाठी तिर्थक्षेत्र विकासनिधीमधून मंजुर केलेले होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी 20 लाख रुपये श्रीक्षेत्र महालक्ष्मी देवस्थानच्या वाॅल कंपाऊंडसाठी मंजूर केलेले होते. महालक्ष्मी देवीचे जागृत देवस्थान, भाविकांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणार्‍या देवीसाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विशेष प्रयत्न करून तीर्थक्षेत्र “ब” वर्ग दर्जा मिळवून देऊन ग्रामविकास व जलसंधारण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यामध्ये पुरुष भक्तनिवास 90 लाख रुपये, महिला भक्त निवास 35 लाख रुपये, वाहन तळ 20 लाख रुपये, महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय 20 लाख रुपये, देवस्थानला जोडणारा रस्ता 15 लाख रुपये, पाणी पुरवठ्यासाठी 13 लाख रुपये, हायमास्ट दिव्यासाठी 7 लाख रुपये अशा कामांच्या आराखड्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंजूर करून दमदार कामगिरी केलेली आहे. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी विशेष प्रयत्न करून श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थानला “ब” दर्जा मिळवून दिल्याबद्दल भाविकांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहोलार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 26 जुनला होणार – दादासाहेब नामदास
Next articleजिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनेला अंतिम मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here