ग्रामदैवत महालक्ष्मी देवीला पुरंदावडे गावचे सरपंच देविदास ढोपे यांच्या शुभहस्ते अभिषेक
पुरंदावडे (बारामती झटका )
पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सत्ताधारी गटाचे मित्र सहकार विकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात पार पडला. सुरुवातीस पुरंदावडे गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीस विद्यमान सरपंच देविदास ढोपे यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला.

यावेळी पुरंदावडे गावच्या उपसरपंच सौ. सुनिता कुंडलिक पालवे, काळजीवाहू चेअरमन रामचंद्र बाबा गोरे, व्हाईस चेअरमन सौ. आशा हनुमंत पालवे, मार्गदर्शक माजी सरपंच भगवान पिसे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम नाळे, तुळशीराम सुतार, रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक अनंतलाल दोशी, माजी सरपंच प्रताप सालगुडे पाटील, विठ्ठल अर्जुन, माजी चेअरमन पोपटराव गरगडे, तुकाराम चव्हाण, शशिकांत सालगुडे पाटील, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी, सचिव ज्ञानेश राऊत, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, माजी उपसरपंच संतोष शिंदे, नाना पिसे, सागर ओव्हाळ, सुदाम ढगे, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग नाळे, बाळासाहेब सुळे पाटील, हरी राऊत मास्तर, मेजर सावता गोरे यांच्यासह सभासदांचा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. पुरंदावडे व सदाशिवनगर गावातील महापुरुषांना अभिवादन करून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मित्र सहकार विकास पॅनलमध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात गरगडे अशोक तुकाराम, नाळे कुंडलिक रामहरी, सालगुडे बाळासाहेब दिनकर, शिंदे रामचंद्र शंकर, गोरे रामचंद्र बाबा, पिसे भगवान लक्ष्मण, शिंदे जनार्दन सुखदेव, बाळासो आत्माराम असे आठ सदस्य उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात बोराटे अंजना रघुनाथ, सौ. पालवे अशा हनुमंत अशा दोन महिला आहेत. इतर मागास वर्गीय गटात ढगे वसंत नारायण, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात अर्जुन दादासो काशीद, अनुसूचित जाती जमाती गटात वाल्मीक वसंत असे सर्व मिळून तेरा सदस्य उभे आहेत. सर्वांना कपबशी हे चिन्ह मिळालेले आहे.


राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून सांगितले की, पुरंदावडे विकास सेवा सोसायटीचा कारभार पारदर्शक व सभासदांचे हित साधले जात आहे. संस्थेची जागा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी संपादित झालेली आहे. लाखो रुपये मिळालेले आहेत, त्यामुळे सभासदांच्या उपयोगासाठी सदरचा पैसा वापरला जाणार आहे. निश्चितपणे सत्ताधारी गटावर सभासद विश्वास ठेवून मतदान करतील, असा विश्वास असल्याने मित्र सहकार विकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. सर्व सभासदांपर्यंत पोहचून भविष्यामधील ध्येयधोरणे सांगून जास्तीत जास्त मतदान कसे घेता येईल, यासाठी सर्व ज्येष्ठ मंडळी व संस्थेचे आजी माजी चेअरमन आदी सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांनी सांगितले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
