सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला
पुरंदावडे ( बारामती झटका )
पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित पुरंदावडे, ता. माळशिरस या संस्थेची सन 2021- 22 ते 2026-27 या सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक श्री संत ज्ञानेश्वर माऊली सहकार विकास पॅनल व मित्र सहकार विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये समोरासमोर चुरसीची व रंगतदार निवडणुकीत शांततेत 476 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी पुरंदावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर हक्क बजावला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली सहकार विकास पॅनलमध्ये सर्वसाधारण सभासद कर्जदार गटात भुजबळ आप्पा भिमराव, गरगडे बाळासाहेब कृष्णा, गेंड तुकाराम भाऊ, गोरे गोपाळ बाबा, कुलकर्णी प्रसाद विष्णू, पालवे राजाराम पांडुरंग, सालगुडे भानुदास ज्ञानेश्वर, सुळे माणिक सोपान असे आठ सदस्य उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात जठार जानकाबाई बबन, सालगुडे विद्या राजकुमार, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात पालवे विजय रघुनाथ, इतर मागासवर्गीय गटात अंकुश महादेव, अनुसूचित जाती-जमाती गटात ओवाळ मुकुंद वामन अशी तेरा सदस्य आहेत.

मित्र सहकार विकास पॅनलमध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात गरगडे अशोक तुकाराम, नाळे कुंडलिक रामहरी, सालगुडे बाळासाहेब दिनकर, शिंदे रामचंद्र शंकर, गोरे रामचंद्र बाबा, पिसे भगवान लक्ष्मण, शिंदे जनार्दन सुखदेव, सुळे बाळासो आत्माराम असे आठ सदस्य उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात बोराटे अंजना रघुनाथ, सौ. पालवे आशा हनुमंत अशा दोन महिला आहेत. इतर मागास वर्गीय गटात ढगे वसंत नारायण, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात अर्जुन दादासो काशीद, अनुसूचित जाती जमाती गटात ओवाळ मुकुंद वसंत असे सर्व मिळून तेरा सदस्य उभे आहेत.
पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना 1935 सालची स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. संस्थेची पुणे पंढरपूर रोड लगत 40 गुंठे जागा होती, त्यापैकी पालखी महामार्गामध्ये सोळा गुंठे जागा गेलेली आहे. 24 गुंठे जागा संस्थेच्या स्वतःची आहे. संस्थेचे 27 लाख भागभांडवल आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल पंचाहत्तर लाखावर होती, मात्र कर्जमाफी नंतर वार्षिक उलाढाल कमी होऊन पंधरा लाखावर आलेली आहे. सोसायटीचे 702 सभासद आहेत, त्यापैकी 603 मतदान करण्यास पात्र आहेत. पात्र सभासदांपैकी 476 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 100 च्या आसपास मयत आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे डी.पी. राऊत केंद्रप्रमुख आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी जी.बी. जाधव व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. जरे यांनी काम पाहिले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष भोसले व पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. टी. घोगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, सहा वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
