पुरंदावडे सोसायटीचे नूतन चेअरमन बाळासो सुळे पाटील यांचा बैलगाडा चालक-मालक संघटनेच्यावतीने सन्मान संपन्न.

पुरंदावडे ( बारामती झटका )

पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी बाळासो आत्माराम सुळे पाटील यांची निवड झाल्याबद्दल बैलगाडा चालक-मालक संघटनेच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी सन्मान संपन्न झाला. यावेळी बैलगाडा मालक प्रकाश कापसे, आण्णा कापसे, रुपेश कापसे, शाहिद शेख, अक्षय कागदे, यांच्यावतीने फेटा, श्रीफळ, हार घालून पेढा भरवून सन्मान करण्यात आला.

यावेळी मित्र सहकार पॅनलचे प्रमुख पुरंदावडे गावचे कार्यकुशल सरपंच बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे, ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच पोपटराव गरगडे, महादेव बोराटे, सुदाम ढगे, सचिन ढगे, अशोक दादा ओव्हाळ आदी उपस्थित होते.

पुरंदावडे गावचे सर्वसामान्य परिवारातील मात्र निष्ठावान कार्यकर्ते बाळासाहेब सुळे पाटील यांना सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत चिठ्ठीवर विजय होऊन सुद्धा मित्र सहकार पॅनलमधील सर्व संचालकांनी चेअरमन पदाची संधी दिलेली आहे. बाळासाहेब यांनी आजपर्यंत पार्टीसाठी निस्वार्थी भावनेने काम केलेले आहे. त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना चेअरमन पदाची संधी मिळालेली आहे. या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यामध्ये मित्रपरिवार व नातेवाईक यांचेकडून बाळासाहेब सुळे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमांडवे पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर होलार समाज प्रबळ दावेदार राहणार.
Next articleजांबुड सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी राहुल खटके तर, व्हाईस चेअरमनपदी प्रकाश जयवंत यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here