पुरंदावडे सोसायटीच्या निवडणुकीची पहिली ठिणगी पडली ओबीसीचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांची हकालपट्टी.

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष फोंडशिरसचे युवा नेते सुनील विष्णू गोरे.

माळशिरस ( बारामती झटका )

पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. पुरंदावडे सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांनी वेगळी भूमिका घेतलेली असल्याने त्यांना त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली असल्याने पुरंदावडे सोसायटीच्या निवडणुकीची पहिली ठिणगी पडली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्षपद सोमनाथ पिसे यांच्याकडे होते. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अविनाश श्रीधर मार्तंड यांनी फोंडशिरस गावचे युवा नेते सुनील विष्णू गोरे यांची ओबीसी सेलच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे. सदर निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजनजी पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सुनील विष्णू गोरे यांना दिलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदावर आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. जयंतरावजी पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते ना. छगनरावजी भुजबळ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वरजी बाळबुधे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य ओबीसी घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी आपले सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे. आपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदन, असे पत्र जिल्हाध्यक्ष अविनाश श्रीधर मार्तंडे यांनी दिलेले आहे.

तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांना पदावरून अचानक हटवलेले असल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. सध्या सोमनाथ पिसे यांच्या पुरंदावडे गावात विकास सेवा सोसायटीची निवडणूक सुरू आहे. सदरच्या निवडणुकीचे हकालपट्टी करण्याचे कारण असू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते शामराव भोसले
Next articleLoan Application Denham Springs, LA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here