माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील, सभेचे आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दैदिप्यमान यश
सभापती सौ. वैष्णवीदेवी व श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सभासदांनी सोसायटीच्या विजयाची दिली भेट.
पुरंदावडे ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात सुपरिचित व राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणारी पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन पुरंदावडे सदाशिवनगर गावातील ज्येष्ठ नेते मंडळी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या सहकार्याने व सभासदांच्या विश्वासावर सर्व कार्यकर्त्यांनी मित्र सहकार पॅनलच्या बारा उमेदवारांनी दैदिप्यमान विजय मिळविल्याने मोहिते पाटील गटाची एक हाती सत्ता आलेली असून आमचे मार्गदर्शक अर्जुनसिंह मोहिते पाटील व सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला सभासदांनी सोसायटीवर विजय मिळवून भेट दिलेली असल्याचे पॅनल प्रमुख व पुरंदावडे गावचे विद्यमान सरपंच देविदास ढोपे यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधताना सांगितले.
मित्र सहकार विकास पॅनलसाठी काळजीवाहू चेअरमन रामचंद्र बाबा गोरे, व्हाईस चेअरमन सौ. आशा हनुमंत पालवे, मार्गदर्शक माजी सरपंच भगवान पिसे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम नाळे, माजी संचालक व पुरंदावडे गावचे माजी सरपंच विष्णू ओव्हाळ, ज्येष्ठ नेते तुळशीराम सुतार, रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक अनंतलाल दोशी, धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन व माजी सरपंच प्रताप सालगुडे पाटील, माळशिरस तालुका रेशन दुकानदार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल अर्जुन, माजी चेअरमन पोपटराव गरगडे, जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष तुकाराम चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सुदाम ढगे, युवा नेते शशिकांत सालगुडे पाटील, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी, सचिव ज्ञानेश राऊत, युवा नेते सोमनाथ पिसे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, उपसरपंच कुंडलिक पालवे, माजी उपसरपंच संतोष शिंदे, मेडद गावचे उपसरपंच शिवाजी लवटे, युवा नेते हरिभाऊ पालवे, ज्येष्ठ पत्रकार विष्णू भोंगळे, शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले, नाना पिसे, राजाभाऊ अर्जुन, सोपान ढोपे, बाळासाहेब ओव्हाळ, ज्ञानदेव चव्हाण, गुलाब वाघ, गणेश ओवाळ, बापू घाडगे, पोपट पालवे, बाळासाहेब पिसे, सुनील सालगुडे, नामदेव बोडरे, अण्णा अर्जुन, हरी राऊत, तुकाराम ढगे, बाळू पांडुरंग सुळे, बबन सुळे, श्रीकृष्ण गोरे, सागर ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग नाळे, बाळासाहेब सुळे पाटील, शंकर पालवे, विशाल ओव्हाळ, हरी राऊत मास्तर, मेजर सावता गोरे आदी मंडळींनी प्रचाराची धुरा सांभाळलेली होती. मिळून मिसळून काम केलेले असल्याने पॅनलचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत.

त्यामध्ये मित्र सहकार विकास पॅनलमध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात गरगडे अशोक तुकाराम, नाळे कुंडलिक रामहरी, सालगुडे बाळासाहेब दिनकर, गोरे रामचंद्र बाबा, पिसे भगवान लक्ष्मण, शिंदे जनार्दन सुखदेव, सुळे बाळासो आत्माराम असे आठ सदस्य उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात बोराटे अंजना रघुनाथ, सौ. पालवे आशा हनुमंत अशा दोन महिला आहेत. इतर मागास वर्गीय गटात ढगे वसंत नारायण, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात अर्जुन दादासो काशीद, अनुसूचित जाती जमाती गटात ओवाळ वाल्मीक वसंत असे 12 संचालक निवडून आलेले आहे. शिंदे रामचंद्र शंकर यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात येणार असल्याचे देविदास ढोपे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng