माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जेष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील व युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सरपंच देविदास ढोपे यांच्या नेतृत्वाखाली निवडी जाहीर
पुरंदावडे सोसायटीवर माळी समाजाचे प्राबल्य असताना मराठा व धनगर समाजास प्रतिनिधित्व करण्याची संधी
पुरंदावडे (बारामती झटका )
पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवड व संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या बिनविरोध निवडी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते जलनायक अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदावडे गावचे कार्यक्षम व कर्तुत्ववान सरपंच बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या आहेत.
मित्र सहकार पॅनलचे 12 सदस्य निवडून आलेले होते. शुक्रवार दि. 17 जून 2022 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. जरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये मित्र सहकार पॅनल प्रमुख बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन पदासाठी बाळासो आत्माराम सुळे पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी दादासो काशिनाथ अर्जुन यांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी मित्र सहकार पॅनलचे प्रमुख व विद्यमान सरपंच बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे, माजी चेअरमन रामचंद्र गोरे, व्हाईस चेअरमन अरुण धाईंजे व सौ. आशाताई पालवे, माजी सरपंच भगवान पिसे व प्रताप सालगुडे पाटील, माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते पोपटराव गरगडे, नामदेव बोडरे, संतोष शिंदे, कुंडलिक पालवे आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक, माजी संचालक, पुरंदावडे व सदाशिवनगर गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन पदी बाळासाहेब सुळे पाटील व व्हाईस चेअरमन पदी दादासो अर्जुन यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. संस्थेचे सचिव गोरख शिंदे यांनी सहकार्य केले. निवडीची घोषणा केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. वाजत गाजत ग्रामदैवत यांचा आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित सर्व रवाना झाले.
पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा संस्थेवर माळी समाजाचे प्राबल्य आहे. संस्थेमध्ये पाच माळी समाजाचे संचालक असताना मराठा व धनगर समाजाला प्रतिनिधित्व देऊन माळी समाजाने मनाचा मोठेपणा दाखविलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng