पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होण्याचा मान जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाघोलीला

वाघोली (बारामती झटका)

माळशिरस तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे साहेब, केंद्रप्रमुख दिलीपरावजी ताटे साहेब यांनी वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी स्नेहल शंकर मिसाळ, शिवतेज गणेश मिसाळ, माधुरी सिताराम यादव या गुणवंत विद्यार्थ्यांचा व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक आनंद श्रीहरी जाधवर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा खेत्री मस्के सर यांचा सन्मान केला.

शाळेची गुणवत्ता व गावातील शिक्षक यांनी शाळेची ठेवलेली व्यवस्था पाहून सर्व गावातील शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मिसाळ सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र मिसाळ सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक पाटोळे सर, जिवाजी मिसाळ सर, दिगंबर मिसाळ सर, श्रीमती मनीषा गायकवाड मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article“आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय; दादा तुम्ही विरोधी पक्षनेते असला, तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच”
Next articleकोरोना काळातील साहित्याने अचानक पेट घेतला ? का जाळले ?, कारण मात्र गुलदस्त्यात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here