पेरु, डाळींब, सिताफळ उत्पादनात फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅग वापरणे काळाची गरज – सतीश कचरे

सोलापूर (बारामती झटका)

डाळींब पिकावरील खोड पोखरणारा भुंगा तेल्या.. नियंत्रणासाठी करावी लागणारी खटाटोप व जिखरीचे झालेले यावरील नियंत्रण आणि मर रोगामुळे कमी होत असलेले रोपाचे प्रमाण तसेच हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादनातील वाढलेली जोखीम यामुळे या पिकाखालील क्षेत्र कमी होऊन कमी पाण्यात हलक्या मध्यम जमीनीवर कमी पीक संरक्षणात येणारी अधिक उत्पादनक्षमता असलेली चांगला बाजारभाव व बाजारात मागणी असलेली फळ पिके, पेरू व सिताफळ या पिकाकडे शेतकरी वर्गाचा कल वाढून या खालील क्षेत्रात खुप झपाट्याने वाढ होत आहे.

उत्पादनात वाढ झाली परंतू, बाजारपेठेतील चोखळदंत ग्राहकाला उपलब्ध होणारी फळे स्क्रॅच डाग विरहीत रसरशीत किडी व रोग विरहीत उत्तम दर्जाच्या फळांची मागणी वाढत आहे. पेरू फळे रसरशीत डाग स्क्रिप डॅमेज विरहीत जर बाजारपेठेत पोहचली तर नक्कीच चांगला जादाचा भाव मिळणेस मदत होते. यावर कमी खर्चात उपाय म्हणजे पेरु फळे अंड्याएवढी झाली. फोम बॅग कव्हर व अॅन्टी फॉग पॉलिथिन बॅगचा वापर फळे झाकणेसाठी करणे हा होय. यामुळे फळमाशीचा प्रार्दुभाव ९५ % टाळला जातो. पिकलेल्या फळात अळी पडणे ९५% टाळले जाऊन यामुळे पेरू फळे २०-३० दिवस अगोदर काढणीस येतात. पेरू फळासाठी १८ सेमी ते २० सेंमी आकाराची फोम कव्हर व १ किलो वजन आकाराची अॅन्टीफॉग बँग वापरली जाते. सिताफळ पिकात त्याचे पक्वतेच्या वेळी त्याचा येणार गोड वास गोडीमुळे मऊ फळ, सालामुळे फळ माशी आकर्षित होऊन फळात अंडी घालतात व फळ पिकल्यावर त्यामध्ये अळी पडतात व देठ सडणेचे प्रमाण वाढते व १००% नुकसान होते. यावर उपाय म्हणून फळे पिकाच्या पक्कवतेच्या अवस्थेत २२ से.मी. फॉम बॅग १ किलो आकारमानाची अॅन्टी फॉग बॅग लावावी. यामुळे ९५% प्रार्दुभाव रोखला जातो.

डाळींब फळाला फॉमबॅग व अॅन्टी फॉग बॅग लावली तर काढणी, हाताळणी, ट्रान्सपोर्ट मधील डाग स्क्रॅच इजा टाळली जाऊन पॅकिंगचा खर्च ही वाचतो व रंगछटा आबाधीत राहाते. अॅन्टी फॉग बॅग १६० रु. किलो दराने २८० नग मिळतात. म्हणजे प्रति बॅग ५८ ते ६० पैसे खर्च येतो. फोम बॅग १८ से.मी. ६० पैसे २० से.मी. ७० पैसे २२ सेमी ७३ पैशे प्रति बॅग प्रमाणे बाजारात उपलब्ध आहे. ह्या दोन्ही बॅग लावण्यासाठी प्रति बॅग ५० पैसे मजूरी खर्च येते. प्रति फळ फॉग बॅग व अन्टीफॉग बॅग मजुरीसह २रुपये खर्च येतो. म्हणजेच २ रुपयात २५ ते ६० रुपयाचे फळाचे संरक्षण होते व १०० नुकसान टाळले जाते. म्हणून यांचा वापर करण्याचे आवाहन आवाहन सतीश कचरे, मंडल कृषी अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.

बाजारात सहज उपलब्ध होणा्ऱ्या फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅगचा वापर करून ९५% नुकसान टाळता येते. सर्जेराव तळेकर उपविभागीय कृषिअधिकारी, पंढरपुर

कमी खर्चात रोग व किडी विरहीत दर्जेदार उत्पादनासाठी या नवीन आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर

फळांचे अळी स्क्रॅच व डाग विरहीत चकचकीत निसर्गाशी मैत्रीचे संबंधासह आरोग्यदायी दर्जदार उत्पादनासाठी हा अल्प खर्चिक उपाय आहे – रफीक नायकवाडी, विभागीय कृषि सहसंचालक पुणे विभाग.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी अप्पासाहेब कर्चे यांची निवड
Next articleपालकमंत्री दत्तामामा भरणे यांची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here