पैलवान वैभव लवटे पाटील यांच्या वाढदिवसाला नवीन राजकीय वैभवास सुरुवात.

मेडद गावचे राजकारण नवीन वळणावर बाळूभाऊच्या बिर्याणीची तालुकाभर.


मेडद ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांचे चिरंजीव मेडद गावचे युवा नेते पैलवान वैभव लवटे पाटील यांच्या वाढदिवसाला नवीन राजकीय वैभवास सुरुवात झालेली आहे. मेडद गावचे राजकारण नवीन वळणावर सुरू झालेली आहे वाढदिवसानिमित्त बाळूभाऊच्या बिर्याणीची चर्चा तालुकाभर रंगलेली आहे.
बाळूभाऊ यांनी चिरंजीव वैभव याचा वाढदिवस धुमधडाक्यात मेडद येथील मातोश्री निवासस्थानी संपन्न केला.

वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर माणिकराव जगताप, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, पुरंदावडे गावचे सरपंच देविदास उर्फ बाळासाहेब ढोपे, मेडद गावचे विद्यमान उपसरपंच शिवाजीभाऊ लवटे पाटील, उद्योजक विजयराव तुपे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवराज उर्फ भैय्यासाहेब निंबाळकर, चेअरमन अनिल भानुदास झंजे, सचिन उर्फ धुळा लवटे, शंकरराव काळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील दादासो सरतापे, संगीता झंजे, संचालक माणिकराव सोनटक्के बाळासाहेब हांगे, उत्तमराव भिसे, शिवाजीराव भिसे, पप्पू जगताप पिंटू जगताप, निलेश जगताप, भटक्या-विमुक्त अध्यक्ष नवनाथ शेगर, डॉक्टर जितेंद्र तुपे, जयवंत तुपे, दिनकर लवटे, सतीश काळे, रामा यादव, श्रीमंती यादव जयराम वळकुंदे, नवनाथ बाळू पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वासू सहकारी महादेव काळे,मधुकर काळे ,माऊली काळे ,बाळू बलभीम हांगे यांच्यासह बाळूभाऊ यांच्यावर प्रेम करणारे मिळत पंचक्रोशीतील अनेक जुने सहकारी वैभव लवटे पाटील यांचा तालुक्यातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब लवटे पाटील यांनी आलेल्या लोकांचे स्वागत केले.

उपस्थित मान्यवर यांनी वैभव यास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन उपस्थितांनी बिर्याणीवर ताव मारला मेडद गावच्या नवीन राजकारणाची दिशा देणारा वाढदिवस ठरला आणि वाढदिवसाच्या बिर्याणीची चर्चा तालुकाभर पसरली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथे बारामती ॲग्रोच्या मॅनेजर वर प्राणघातक हल्ला करून गाडीचे दोन लाखाचे नुकसान.
Next articleडोंबाळवाडी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात – माजी सरपंच नाथासो रुपनवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here