पै. विशाल उर्फ प्रकाश बनकर यांचेकडून माळशिरस तालुक्यातील कुस्ती शौकिनांच्या अपेक्षा उंचावल्या.

माळशिरस तालुक्याला विशाल उर्फ प्रकाश बनकर यांच्याकडून महाराष्ट्र केसरीची तिसरी गदा मिळावी, कुस्ती शौकिनांची अपेक्षा.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर, मांडवे येथील महाराष्ट्र केसरी स्व. तानाजी बनकर यांचा पुतण्या पैलवान विशाल उर्फ प्रकाश बनकर यांचेकडून माळशिरस तालुक्यातील कुस्ती शौकिनांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. माळशिरस तालुक्याला विशाल उर्फ प्रकाश बनकर यांच्याकडून महाराष्ट्र केसरीची तिसरी गदा मिळावी, अशी कुस्ती शौकिनांची अपेक्षा वाढलेली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 अंतिम लढतींमध्ये मुंबईचा पै. प्रकाश उर्फ विशाल बनकर विरुद्ध कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये सायंकाळी सहा वाजता लढत रंगणार आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब कोण जिंकणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे.

आज सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या स्पर्धेत माती विभागातून मुंबईचा पै. विशाल बनकर विरुद्ध पै. सिकंदर शेख वाशिम यांच्यामध्ये रंगलेल्या लढतीमध्ये पै. विशाल बनकर यांनी पै. सिकंदर शेख वर मात करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर गादी विभागाच्या उपांत्य फेरीत पै. हर्षद कोकाटे पुणे विरुद्ध पै. ऋतुराज पाटील कोल्हापूर यांच्यामध्ये झालेल्या लढतीमधून गादी विभागातून पै. ऋतुराज पाटील यांनी बाजी मारली आहे.

पै. विशाल उर्फ प्रकाश बनकर व पै. ऋतुराज पाटील यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत सायंकाळी रंगणार आहे. त्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, यांच्यासह माळशिरस तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमी सातार्‍याच्या दिशेने निघालेले आहेत. माळशिरस तालुक्यातील अनेक लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. माळशिरस तालुक्याला 1988 साली निमगाव गावचे सुपुत्र पै. छोटा रावसाहेब मगर यांनी पहिली महाराष्ट्र केसरीची गदा माळशिरस तालुक्याला मिळवून दिली. 1987 साली मांडवे सदाशिवनगर गावचे सुपुत्र पै. तानाजी बनकर यांनी दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली होती. पै. विशाल उर्फ प्रकाश बनकर यांच्या रूपाने माळशिरस तालुक्याला तिसरी महाराष्ट्र केसरी गदा मिळवण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत प्रकाश बनकर यांनी आपल्या घराण्याचे कुस्ती क्षेत्रातील नाव टिकवून ठेवलेले आहे. महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले आहे. पै. प्रकाश बनकर यांचेसुद्धा वडील वारलेले आहेत. कमी वयामध्ये प्रकाश बनकर यांनी कुस्ती क्षेत्रात माळशिरस तालुक्याचे नाव केलेले आहे. मुंबई विभागातून खेळत असलेला विशाल उर्फ प्रकाश बनकर माळशिरस तालुक्यातील मांडवे सदाशिवनगर गावचा रहिवासी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. प्रसाद सूर्यवंशी यांची अवैध दारू विकणाऱ्यांवर धडक कारवाई
Next articleनव-याला दारूचा नाद, झाला बायकाेबराेबर वाद ..‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here