पोलीस उपनिरक्षक परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा नाळ फाऊंडेशनच्या वतीने सन्मान

उंबरे (बारामती झटका)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरक्षक PSI परीक्षा मधील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा नाळ फाउंडेशनच्या वतीने दि.३०/३/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता उंबरे (वे.) जिल्हा परिषद शाळा येथे सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन नाळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड. सुजीतकुमार थिटे यांनी केले आहे.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकराव मोहिते-पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील, स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रा. बाबुवाहन रोंगे आदी मान्यवर असणार आहेत. तरी सदर सन्मान सोहळ्याप्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी हजर राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शपथविधी कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती
Next articleजळभावी गावात राजकीय नेत्यांचे एकमेकांचे राजकीय पाणी कमी करण्याच्या नादात गावालाच प्यायला पाणी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here