अकलूज (बारामती झटका )
विरयोद्धा माता सावित्रीमाई भागवत उबाळे यांच्या स्मृती स्मरणार्थ सामाजिक, राजकीय व शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींना भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नुकत्याच शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंतीच्या औचित्याने राजदत्तआबा उबाळे अनु. जाती केंद्रीय प्राथमीक निवासी शाळा, वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे. या शाळेच्या प्रांगणात सायंकाळी पुरस्कार वितरण सोहळा भव्य प्रमाणात पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, दुग्धविकास, मत्स्यविकास, संसदीय कामकाज तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्याहस्ते अकलूजमधील आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ विचारवंत प्रकाश काले यांना आजपर्यंत त्यांनी सातत्याने केलेल्या समाजहित रक्षणार्थ उत्कृष्ट अशा लिखाणाबद्दल “लेखण रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भगवानराव वैराट संस्थापक अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर जेष्ठ पत्रकार भिमसेन सर्जेराव उबाळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते. शाल, पुष्प, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रकाश काले यांना “लेखन रत्न” हा पुरस्कार मिळाल्याने अकलूज व संपूर्ण तालुक्यातील अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng