मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर (छोटा), ज्ञानेश्वर कोडग यांचे वर्गमित्र सोपान निकम साहेब (निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश मुंबई) आणि गोवर्धन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न
तोंडले (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील तोंडले (कोडग वस्ती, विश्वांजली निवास) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार ज्ञानेश्वर विश्वंभर कोडग यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत मृदुंग अलंकार ह .भ .प. अरुणजी महाराज शिंदे (तांदुळवाडी), संगीत भजन गायक ह.भ.प. सौदागर महाराज कुंभार (तांदुळवाडी) आणि विष्णू पारसे सर व त्यांचे भजनी मंडळ यांनी उत्कृष्ट भजन सादर केले. तसेच यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब मोरे महाराज (देहूकर) यांच्या शुभहस्ते धान्य तुला करून, ज्ञानेश्वर कोडग व त्यांच्या धर्मपत्नी सौ. कमल कोडग यांचा सन्मान करण्यात आला. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर (छोटा), ज्ञानेश्वर कोडग ( दादा) यांचे वर्गमित्र सोपान निकम साहेब (निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश मुंबई) आणि गोवर्धन चव्हाण (आप्पा) हे होते.

यावेळी ह.भ.प. देहुकर महाराज म्हणाले कि,”कष्टाचे चीज म्हणजेच चेहऱ्यावरील आनंद होय”. मानव पैशाने श्रीमंत नसतो तर मनाने श्रीमंत असतो. श्रीमंत कुटुंब कोणते असते ? तर ज्या कुटुंबातील आई वडील आनंदी ते कुटुंब श्रीमंत होय !. तसेच यावेळी त्यांनी उत्सवमूर्ती ज्ञानेश्वर कोडग यांना शतक महोत्सव साजरा करण्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी ज्ञानेश्वर कोडग यांचे मित्र व निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश निकम साहेब म्हणाले, ‘ज्ञानोबा हे खरेच ज्ञानोबा आहेत, त्यांना बालपणापासून खोटे बोललेले आवडत नाही असे म्हणत त्यांनी शाळेतील जुन्या आठवणीला उजाळा दिला. परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. पण त्यांचे स्वप्न त्यांचे चिरंजीव रामचंद्र, रावसाहेब आणि नवनाथ यांच्या रूपाने पूर्ण झाले. आमचे मैत्रीचे नाते अजून अतूट आहे. दादांनी कष्टाच्या जोरावर द्राक्षांचे मळे निर्माण केले. मी दरवर्षी आठवणीने द्राक्षे खायला येतो, असे म्हणत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी या कार्यक्रमांमध्ये योगायोगाने अकलूज येथील दादांची पुतणी सौ. गौरी दिलीप सांगडे हिचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित प्रगतशील बागायतदार श्री. आप्पासाहेब मगर, तोंडले ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.रघुनाथ चव्हाण, दादांचे भाऊ तुकाराम, श्री. नारायण, बहिणी सौ.सुभद्रा गोवर्धन कदम, सौ.शारदा नानासो डोंगरे, मेव्हणे निवृत्ती भीमराव चव्हाण, मावस भाऊ श्री. संभाजी गमे, भावांचे जावई श्री. प्रकाश गायकवाड, श्री. अंकुश इंगोले, श्री. अभिजित वाघ, श्री.सुभाष शेंडगे, तसेच व्याही श्री. माणिक मगर, श्री. अरुण पाटील, श्री. कल्यान यादव, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्याचे नेते तात्यासाहेब यादव गुरुजी (तावशी), हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मारुती देवकर सर, सर्व स्टाफ, डॉ.उदयसिंह माने देशमुख ,डॉ. सौ. शुभांगी माने देशमुख, ज्योतीराम चव्हाण (शिवप्रतिष्ठान तोंडले अध्यक्ष), श्री रामचंद्र दादा चव्हाण(माजी संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज), ह .भ .प. श्री हनुमंत निकम महाराज तोंडले, दीपक चव्हाण (चेअरमन पतसंस्था तोडले), तसेच नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ व कोडग परिवार उपस्थित होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल विठ्ठल शेळके (पोलीस पाटील ,माळखांबी) यांनी केले. तर आभार नवनाथ कोडग (सहशिक्षक हनुमान हायस्कूल ,तांदुळवाडी) यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng