प्रजासत्ताक दिनानिमित्त तरंगफळ ग्रामपंचायतीने पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप.

तरंगफळ ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम दिव्यांग कल्याण निधीतून पांडुरंग गोपीनाथ मोहिते यांना तीन चाकी सायकल वाटप.


तरंगफळ ( बारामती झटका )

भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील तरंगफळ ग्रामपंचायत च्या वतीने पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून पांडुरंग गोपीनाथ मोहिते यांना गरजेनुसार तीन चाकी सायकल चे वितरण करण्यात आले यावेळी तरंगफळ ग्रामपंचायतचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे, उपसरपंच शिवाजी वाघमोडे माजी उपसरपंच अविनाश तरंगे ग्रामपंचायत सदस्य महादेव गोरड सावळा कांबळे व इतर सदस्य यांच्यासह राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय सेवाभावी दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख मारुती जानकर,स्वस्त धान्य दुकान संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष व माजी सरपंच महादेव तरंगे, सुजित तरंगे, लालासाहेब तरंगे, डॉक्टर लोखंडे अक्षय कोडलकर, दादासाहेब बागाव आप्पा वागाव जहांगीर मुलांनी सहदेव तरंगे सरपंच माऊली कांबळे यांचे बंधू ग्राउंड शिक्षण समितीचे अध्यक्ष गोविंद कांबळे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे आदी उपस्थित होते सदर चा कार्यक्रम covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाळुंग श्रीपुर नगरपंचायत वर मोहिते पाटील यांनी कलम केलेल्या कमळाची सत्ता नको, निष्ठावान भाजपच्या मतदारांचा सुर.
Next articleनातेपुते नगरपंचायतमध्ये काय चाललंय ? हे पाहायलासुद्धा राष्ट्रवादीच्या विचाराचा नगरसेवक नाही. राष्ट्रवादीचे दुर्दैव…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here