युवानेते राहुलबापू वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर चाकोरे येथील वाघेश्वरी मित्र मंडळची पंधरा वर्षापासूनची घौडदौड
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील चाकोरे प्रतापनगर येथील वाघेश्वरी मित्र मंडळाच्यावतीने आदीमाया शक्ती दुर्गादेवीच्या शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी औंध येथील यमाईदेवी मंदिराच्या गाभाऱ्यामधून ज्योत प्रज्वलित करून चाकोरे गावच्या दिशेने वाजत गाजत रवाना झाली. दरम्यान ठीकठिकाणी ज्योतीचे स्वागत केले जात होते. माळशिरस शहरातही या ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले.
वाघेश्वरी मित्र मंडळाची युवा नेते राहुल बापू वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा वर्षापासून घौडदौड सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवात अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून घेतले जातात. सर्व वाघेश्वरी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मिळून मिसळून कार्यक्रम करीत असतात.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng