जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरूपा राणी मोहिते पाटील यांनी गोरगरिबांची दिवाळी गोड केली.
अकलूज ( बारामती झटका )
प्रताप क्रीडा मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या कु. स्वरूपा राणी मोहिते पाटील उर्फ राणुदीदी यांनी मंडळाचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांना दीपावली निमित्त दिलासा देणारा रत्नाई मिठाई या उपक्रमाला उजाळा देऊन गोरगरीब सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड केलेली आहे.
स्वर्गीय सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.जयसिंह मोहिते पाटील यांनी सन १९७६ साली मंडळाची स्थापणा केली. प्रताप क्रीडा मंडळ कला,क्रीडा व सामाजीक क्षेञात मोलाचे योगदान देत आहे. मा.श्री.मदनसिंह मोहिते पाटील,कै.उदयसिंह मोहिते पाटील यांचेसह बाळदादांनी केवळ ३६ सवंगड्यांना सोबत घेऊन प्रताप क्रीडा मंडळाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,सांस्कृतिक स्पर्धासह विवीध उपक्रमांचे आयोजन करुन मंडळाला महाराष्ट्रासह देशात लौकीक प्राप्त करुन दिलेला आहे. सामाजीक बांधीलकीची जाणीव ठेऊन प्रताप क्रीडा मंडळाने समाजातील सामान्यांच्या अर्थिक परिस्थीचा विचार करुन त्यांनाही दिवाळी सणाचा आस्वाद घेता यावा या साठी १९७८ साला पासून ना नफा ना तोटा या तत्वावर इंदीरा मिठाई विक्रीला प्रारंभ केला.तो सलग २७ वर्ष सुरु होता. विजय चौकातील सिव्हिक सेंटर येथे छोट्याशा जागेत सुरु केलेल्या उपक्रमात बुंदीचे लाडू(२१रु.प्रति किलो) व चिवडा(२५रु प्रति किलो) यांची विक्री केली जात असे.या मध्ये अनुसूचित लोकांसाठी विशेष सवलत म्हणून केवळ १७ रु.प्रतिकिलो देण्यात येत असे.या साठी मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांचेसोबत माजी सरपंच कै.रमणलाल व्होरा उर्फ बापूजी, मा.सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील,मा.सौ.सुमिञादिदी,मा.श्री.संग्रामसिंह उर्फ आण्णासाहेब, मा.श्री. सुभाष दळवी,मा.श्री.सुभाष अंधारे,मा.श्री आण्णा जावळे,मा.श्री.प्रद्यूम्न गांधी,मा.श्री.विनोदकुमार दोशी आदी मान्यवरांचा सहभाग होता.

प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष कुमारी स्वरुपरणी मोहिते पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर तीच परंपरा व तोच वारसा जोपासत आधूनीक तंञज्ञान, व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रताप क्रीडा मंडळाच्या नूतन अध्यक्षा मा.कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील उर्फ दिदीसाहेब यांनीही सन २०२१ पासून पुन्हा नव्याने रत्नाई मिठाई या नावाने हा उपक्रम सुरु केला आहे.

दर्जेदार स्वादिष्ट दिवाळीचा फराळ, मिठाई आता ना नफा ना तोटा या उद्देशाने सामाजीक बांधीलकी जपत, प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दिवाळी करीता शंकरनगर येथे उभारलेल्या ‘रत्नाई मिठाई ‘ स्टाॕलचे उद्घाटन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांचेहस्ते झाले.या वेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व जि.प.सदस्या कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील,दिपकराव खराडे पाटील,प्रदीपराव खराडे पाटील आशिष खराडे पाटील, सुभाष दळवी,विजय दोशी,वसंत जाधव,उत्कर्ष शेटे,मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पाटील,सचिव पोपटराव भोसले पाटील यांचेसह विवीध संस्थांचे पदाधीकारी उपस्थित होते.प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या,मागील दोन वर्ष कोरोना मुळे सगळेच ठप्प होते.या मध्ये प्रताप क्रीडा मंडळाने घालून दिलेल्या परंपरेनूसार सामाजीक बांधीलकी जोपासत रत्नाई मिठाई चा प्रारंभ केला आहे. या उपक्रमामुळे अनेकांची दिवाळी सुखकर होणार आहे. १९९४ पासून सदरचा उपक्रम हा इंदिरा मिठाई म्हणून कार्यरत होता.तो आता रत्नाई मिठाई म्हणून नव्याने सुरु केला आहे. आत्तापर्यंत १५९८ किलोची मागणी मंडळाकडे नोंदवली असून या पुढेही ती वाढत राहणार आहे.मंडळाचे कामकाज भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील म्हणाले,मागील साठ वर्षाची दिवाळी व आत्ताची दिवाळी या मध्ये मोठा फरक आहे.जीवनशैली बदलली आहे. काळानूसार बदलले पाहिजे. रत्नाई मिठाई हा उपक्रम मंडळाने सामाजीक बांधीलकी जोपासत समाजाला याचा लाभ व्हावा या साठी राबविला असून तो कौतूकास्पद आहे. सन २०२२ मध्ये प्रताप क्रीडा मंडळाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करावे.त्या करीता राज्यातून व देशातून खेळाडू,क्रीडा रसिक ईथे येतील व त्या साठी सर्वतोपरी सहकार्य करु.या वेळी त्यांनी प्रताप क्रीडा मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. प्रस्तावीक राजेंन्द्र देवकर यांनी केले.सुञसंचलन किरण सूर्यवंशी यांनी केले.तर आभार रणजित रणवरे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng