प्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा – ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर

गंगाखेड (बारामती झटका)

सैनिक आणि शेतकरी हे देशाचे सर्वात महत्त्वाचे दोन घटक आहेत. प्रत्येक आईने आपला एक मुलगा सैनिक म्हणून देशासाठी द्यावा असे आवाहन संत देवईमाय संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी बुधवारी लेंडेगाव परिसरातील तुकाईच्या माळावर आयोजित किर्तन सप्ताहात काल्याचे किर्तनात बोलताना केले.

लेंडेगाव पंचक्रोशीतील भक्तांच्यावतीने प्रसिद्ध तुकामाईच्या टेकडीवर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी झाली. तुळशीदास महाराज देवकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनात देवकर महाराजांनी शेतकरी आणि सैनिक या दोघांचे देशासाठी असलेले योगदान विशद केले. प्रत्येक आईने आपला मुलगा सैनिक बनवत देशासाठी देण्याचं आवाहनही महाराजांनी आपल्या कीर्तनात बोलताना व्यक्त केले. सुट्टीवर असलेल्या उपस्थित 25 नवतरुण सैनिकांचा ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर, परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याहस्ते वैकुंठवासी संत देवईमाय यांची प्रतिमा व पुष्पहार देऊन करण्यात आला. उपस्थित नसलेल्या सैनिकाच्या कुटुंबीयांनी यावेळी सत्काराचा स्वीकार केला.

या सत्कार सोहळ्यास सखाराम बोबडे पडेगावकऱ, विक्रम बाबा इंमडे, मुंजाभाऊ लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह.भ.प. भगवान महाराज इसादकर यांचे सह परिसरातील गायक, मृदंगाचार्य, भजनी मंडळी उपस्थित होते. कीर्तनानंतर या ठिकाणी संत देवईमाय व संत तुकामाई यांच्या मंदिर बांधकामाचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कीर्तनानंतर हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लेंडेगाव, तांदूळवाडी, सिरसम, लोहराल, चोरवड, बनवस, रामतीर्थ, डोंगरगाव, महादेववाडी आदी गावातील भाविक भक्तांनी पुढाकार घेतला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleइंदापूर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleफलटण येथे स्वराज फाउंडेशन व सांसा फाउंडेशन आयोजित केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here