दि.०२ ऑक्टोबर पर्यंत चालणार प्रक्रिया
पंढरपूर (बारामती झटका)
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी.फार्मसी (डिप्लोमा) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड) गुरुवार, दि. ३० सप्टेंबर २०२१ पासून सुरु होणार असून ती शनिवार, दि.०२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६५०५) मध्ये ऑनलाईन कॅप राउंड ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. तसेच यंदाच्या वर्षीपासून अर्थात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसी महाविद्यालयांतर्गत नवीन डी. फार्मसीच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे तसेच हा कोर्स ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेने सुरू करण्यात आला असून फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६३९७) ला देखील मान्यता मिळाली आहे. याठिकाणी देखील प्रवेश प्रक्रियेची सोय करण्यात आली आहे. या डी. फार्मसी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर सोमवार दि.४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.’ अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर चे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
सन २०२१-२२ च्या पदविका फार्मसी अर्थात डी. फार्मसी प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर पहिली फेरी संपल्यानंतर आता येत्या गुरुवारी, दि.३० सप्टेंबर पासून ते शनिवार,दि. ०२ ऑक्टोबर पर्यंत प्रवेशाची दुसरी फेरी (कॅप राउंड-२) चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. यासाठी विशेष अभ्यास करून कॅप राऊंड-२ चे ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरावेत. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. कॅप राउंडच्या या तीन दिवसात घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सर्व ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या, पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी जागावाटप सोमवार, दि. ०४ ऑक्टोबर रोजी सबंधित संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाईल. दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्विकृती मंगळवार, दि.०५ ऑक्टोबर ते गुरुवार, दि.०७ ऑक्टोबर या दरम्यान करता येईल व त्यानंतर जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून प्रवेशाची निश्चिती करण्याची मुदत मंगळवार, दि.०५ ऑक्टोबर ते शुक्रवार, दि.०८ ऑक्टोबर असेल. प्रथम वर्ष डि.फार्मसीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. एन.ए. दांडगे (मोबा.क्र. ९३७३०९१०४१) व प्रा. वृणाल मोरे (मोबा.क्र.९६६५१९६६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजन बद्ध मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. सतिश मांडवे व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य उत्तमरीत्या सुरु आहे. डी.फार्मसीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीमध्ये फार्मसीच्या दोन्ही महाविद्यालयात अभूतपूर्व गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng